आभई फाटा चौफुलीवर गतिरोधक बसविण्याची सरपंच हेमंत गौरकार यांची मागणी
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी कोरपना मार्गावरील आभई फाटा चौफुलीवर गतिरोधक बसविण्याची मागणी खांदला ग्रामपंचायतेचे सरपंच हेमंत गौरकार यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. आभई फाट्यावर अपघात वाढले असून आभई फाट्याला जोडणाऱ्या वणी, कोरपना व शिंदोला या तीनही रस्त्यांवर गतिरोधक बसविने गरजेचे झाले आहे. अन्यथा भविष्यात आभई फाटा चौफुलीवर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
आभई फाटा ही चौफुली वाहतुकीने नेहमी गजबजलेली असते. आभई फाट्याला जोडलेल्या तीनही मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. आभई फाट्यावरून कोळसा वाहतुकीची वाहने सुसाट धावतात. मालवाहतुकीच्या सुसाट वाहनांमुळे आभई फाट्यावर कित्येक अपघात देखील झाले आहेत. या अपघातात निष्पाप जीवांचे बळी देखील गेले आहेत. आभई फाटा चौफुलीवर झालेल्या अपघातात आतापर्यंत ९ जनांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे या चौफुलीवर गतिरोधक बसविणे गरजेचे झाले आहे.
वणी, शिंदोला व कोरपना हे तिन्ही मार्ग आभई फाट्याला जोडलेले आहेत. या तीनही मार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी व मालवाहतूक सुरु असते. त्याचबरबरोबर आभई फाटा येथून कोळशाची वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरु असते. मुंगोली कोळसाखाणीकडे जाणारा पूल बंद झाल्याने कोळशाची वाहतूक करणारे ट्रक आभई फाट्यावरूनच सुसाट धावतांना दिसतात. कोळसा वाहतुकीच्या ट्रकांमुळे आभई फाटा चौफुलीवर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे आभई फाट्याला जोडणाऱ्या वणी, कोरपना व शिंदोला या तीनही रस्त्यांवर गतिरोधक बसविणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अन्यथा मालवाहू व प्रवासी वाहनांच्या सुसाट वाहतुकीमुळे आभई फाटा येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आभई फाट्यावरील वाढते अपघातांचे प्रमाण लक्षात घेता याठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी खांदला ग्रामपंचायतेचे सरपंच हेमंत गौरकार यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
Comments
Post a Comment