पुरड (नेरड) येथील इसमाने घेतला विषाचा घोट

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुक्यातील पुरड (नेरड) येथील रहिवासी असलेल्या इसमाने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज २५ मे ला सकाळी उघडकीस आली. संभाजी यादव बदखल (५०) असे या विषाचा घोट घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. शिरपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आल्यानंतर येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वणी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह अंतिम संस्काराकरिता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.  

संभाजी बदखल यांनी सकाळी ९ वाजताच्या सुमारास राहत्या घरी विष प्राशन केले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ संभाजीला शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर येथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. संभाजी बदखल यांच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप कळू शकले नाही. शिरपूर पोलिस त्यांच्या आत्महत्या करण्यामागच्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. संभाजी बदखल यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी