प्रशांत चंदनखेडे वणी
उकनी ग्रामपंचायतचे माजी सरपंच, रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेडचे अध्यक्ष, वसंत जिनिंगचे संचालक व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले संजय खाडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृध्दाश्रमाला आर्थिक सहाय्यता देण्याबरोबरच निराधार वृद्धांना कुटूंबासह फळ वाटप करतांनाच त्यांची आस्थेने विचारपूस करण्यात आली. वृद्धाश्रमात कुटुंबासह जाऊन निराधार वृद्धांसोबत काही क्षण घालवून त्यांच्याप्रती दाखविलेल्या आस्थेमुळे निराधार वृद्धांचे मनही गहिवरून आले.
आयुष्याच्या सायंकाळी आपल्या हक्काच्या माणसांनी दूर लोटलेल्या वृद्धांना मायेचा ओलावा देऊन त्यांच्या मनातील दुःखाचा वणवा शांत करण्याचा प्रयत्न करतांनाच त्यांच्यात परिस्थितीचा सामना करण्याची ऊर्जा भरणारा आपुलकीचा संवाद साधल्याने रक्ताच्या नात्यांनी दूर लोटलेल्या वृद्धांना माणुसकीच्या नात्याचं दर्शन घडलं. काही क्षण का होई ना खाडे परिवाराने वृद्धांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलविले. सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या संजय खाडे यांनी उदारमतवादी व्यक्तिमत्वाचा नेहमी परिचय दिला आहे. त्यांच्या हातून नेहमीच मदतीचा ओघ वाहिला आहे.
अशा या मदतगार व्यक्तीचा वाढदिवसही सामाजिक जाणिव ठेऊनच साजरा करण्यात आला. आपल्या वाढदिवशीही आपल्या हातून सामाज कार्य घडावं व आपल्या मदतीतून सामाजिक कार्याला हातभार लागावा म्हणून त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वृध्दाश्रमाला (१० हजार) देणगी दिली. आणि वृद्धांना फळं वाटप करून त्यांच्या सोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनीचे अध्यक्ष सुहास नांदेकर व वृध्दाश्रमाचे संचालक उपस्थित होते. संजय खाडे यांची दातृत्व भावना सर्वश्रुत असून त्यांची मदती करीता असणारी तत्परता त्यांचे व्यक्तिमत्व उंचविणारी ठरली आहे.
No comments: