महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारीत मोठी वाढ, शारीरिक शोषण व पळून गेल्याच्या तक्रारींनी पोलिसांवरही वाढला तान


प्रशांत चंदनखेडे वणी 

एखाद्याने प्रलोभन, आमिष देऊन प्रेमाचं जाळ फेकलं की त्यात तरुण मुली व विवाहित महिलाही अलगद अडकल्या जातात. कुणी प्रेमाची शीळ घातली की त्याला प्रतिसाद देणाऱ्या मुलींना मात्र नंतर मोठा पश्चाताप सहन करावा लागतो. प्रेमाच्या चंदेरी दुनियेत रममाण होऊन विवाहाची स्वप्ने रंगविणाऱ्या मुली वासनांधतेला बळी पडतांना दिसत आहे. प्रेमात आंधळ्या झालेल्या मुलींना ज्यावेळी आपला विश्वासघात झाल्याची जाणीव होते तेंव्हा खूप वेळ झालेली असते. प्रेमात देहभान हरपलेल्या मुलींना जेंव्हा त्यांचा गैरफायदा घेतल्याचं लक्षात येतं, तेंव्हा त्यांचं प्रेमाचं भूत उतरून त्या भानावर येतात. प्रेमाचं वलय निर्माण करून वासना भागविणारे जेंव्हा त्यांना प्रताडित करतात, तेंव्हा महिला व मुलींना आपली फसवणूक झाल्याची जाणीव होते. आणि मग त्यांच्यावर पोलिस स्टेशनला तक्रार देण्याची वेळ येते. वणी शहर व तालुक्यात महिला व मुलींचे शारीरिक शोषण आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींमध्ये कमालीची वाढ झाली आहे. महिला व मुलींचे शारीरिक शोषण व त्यांना पळवून नेल्याच्या तक्रारी प्रचंड वाढल्या आहेत. अल्पवयीन मुलींनाही फूस लावून पळवून नेत त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत. शहरातील एका युवतीचं विवाहित पुरुषाने शारीरिक शोषण केल्याची तक्रार नुकतीच वणी पोलिस स्टेशनला दाखल झाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची न्यायालयीन कोठडीत देखील रवानगी करण्यात आली आहे. 

त्याने शहरातील एका युवतीशी जवळीक साधत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला प्रलोभनं व आमिषं दाखवून तिच्याशी घट्ट संबंध निर्माण केले. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्याची तयारी दर्शवून त्याने तिच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्न करण्याचा बहाणा करीत त्याने अनेक दिवस तिचे शारीरिक शोषण केले. तो लग्नाचे आश्वासन देत तिचे वारंवार शारीरिक शोषण करीत असल्याने युवतीला ते किळसवाणं वाटू लागलं. त्याच्याकडून वारंवार होणाऱ्या शारीरिक सुखाच्या मागणीला कंटाळून युवतीने अखेर त्याच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. युवतीने दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी प्रकरणाची शहानिशा करून आरोपीला तात्काळ अटक केली. आरोपीला मुलंबाळं असून तो मुलांना शिकवणी वर्गाकरीता तेथे न्यायचा. अशातच त्याचं तिच्याशी सूत जुळलं. त्याने लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पत्नी व मुलं असतांनाही त्याने तिचं शारीरिक शोषण केलं. वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून त्याने युवतीवर अत्याचार केला. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी