राम शेवाळकर परिसर येथे उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर, शिबिरात मोफत केली जाईल संपूर्ण आरोग्य तपासणी


प्रशांत चंदनखेडे वणी 

युनिवर्सल हेल्थ केयर द्वारा मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. राम शेवाळकर परिसर येथे ११ जूनला सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे शिबीर असणार आहे. या शिबिरामध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी मोफत केली जाणार आहे. राम शेवाळकर परिसरातील दामले फैल गेटजवळ असलेल्या युनिवर्सल हेल्थ केयर क्लिनिक येथे हे शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. 

आरोग्य हीच खरी संपत्ती असून निरोगी राहण्याकरिता शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. परंतु आजच्या या धकाधकीच्या जीवनात मनुष्य आपल्या आरोग्याची हवी तशी काळजी घेऊ शकत नसल्याने मनुष्यामधे विविध आजार बळावू लागले आहेत. मनुष्य आपल्या आरोग्याचीही वेळोवेळी तपासणी करीत नसल्याने त्यांच्यात अनेक व्याधी उत्पन्न होऊन त्या वाढू लागल्या आहेत. त्यामुळे मनुष्याची आरोग्य तपासणी होऊन त्यांच्यातील रोगाची लक्षणे कळावी या उद्देशाने युनिवर्सल हेल्थ केयर द्वारा मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून संपूर्ण आरोग्याची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्याशी तडजोड न करता आरोग्याची तपासणी करून शारीरिक रोगांची लक्षण जाणून घेणं गरजेचं आहे. त्याकरिता सामाजिक जाणिवेतून घेण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिरांमध्ये आपल्या आरोग्याची तपासणी करून आपलं आरोग्य सुदृढ असल्याची खात्री करून घेणं केंव्हाही चांगलं. तेंव्हा या मोफत आरोग्य शिबिराचा तालुक्यातील नागरिकांनी पुरेपूर लाभ घेऊन आपली आरोग्य तपासणी करून घेण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी