Latest News

Latest News
Loading...

निलगिरी वनात, काय आलं त्याच्या मनात आणि जीवन संपवलं त्यानं क्षणात...


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी घुग्गुस मार्गावरील मंदर गावाजवळ असलेल्या प्रसिद्ध निलगिरी वनात शहरातील जैताई नगर येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १९ जूनला दुपारी १ ते १.३० वाजताच्या सुमारास घडली. निलगिरी वनातील झाडाला गळफास लावून त्याने आपली जिवन यात्रा संपविली. सनी तिरुपती कन्नुरवार (२२) असे या गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

सहलीसाठी प्रसिद्ध असलेल्या निलगिरी वन येथे तरुणाईचा ओढा वाढला आहे. प्रेमी युगलांची मोठ्या प्रमाणात चहल पहल या ठिकाणी दिसून येते. तरुण मुलामुलींच्या वाढलेल्या सहवासाने नागरिकांनी कुटुंबासह या ठिकाणी जाने कमी केले आहे. आज तरुणाने केलेल्या आत्महत्येमुळे या पिकनिक स्पॉटला गालबोट लागले आहे. जैताई नगर येथील रहिवासी असलेला सनी कन्नुरवार हा एकांतिक सहवासात काही क्षण घालविण्याकरिता निलगिरी वनात गेला होता. त्या ठिकाणी असं काय घडलं की, त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला, ही चर्चा रंगू लागली आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या युवकाने आत्महत्येसारखा मार्ग निवडून जीवनाचा शेवट केल्याने कुटुंब पुरतं हादरलं आहे. तरुणाच्या अशा या अकाली जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप कळू शकलं नाही. पोलिस तपासात ते लवकरच समोर येईल. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.