काल रात्री शहरात झाली सिनेस्टाइल मारहाण, दोन ते तीन जनांनी एकाला बेदम मारलं


प्रशांत चंदनखेडे वणी 

पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर काल रात्री मारझोडीचा थरारक सीन शहरवासीयांनी अनुभवाला. एखाद्या चित्रपटातील मारहाणीच्या दृश्याप्रमाणे काल रात्री वर्दळीच्या ठिकाणी तिन जन एकाला अक्षरशः कुटत होते. आणि नागरिक चित्रपटाची शूटिंग पाहतात तसे घोळका करून पहात होते. एकाला बेदम मारहाण होत असतांना शेकडो नागरिक बघ्यांची भूमिका घेत होते. भरचौकात ही फ्री-स्टाईल सुरु होती. वर्दळीच्या चौकात एकाला अमानुष मारहाण केली जात असतांना कुणीही त्याच्या मदतीला धावून गेले नाही. पोलिसही १० ते १५ मिनिटांनी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पोहचण्यास आणखी जरा वेळ केला असता तर घटनेचं स्वरूप काही वेगळंच पहायला मिळालं असतं. कायद्याचा धाकच न उरल्यागत अपप्रवृत्ती थैमान घालू लागली आहे. पोलिसांची त्यांना जराही भीती उरली नसल्याचे त्यांच्या शहरातील अपराधीक कारवायांवरून पहायला मिळत आहे. शहरात संघटित गुन्हेगारी वाढू लागली आहे. टोळक्याने येऊन मारहाण करण्याच्या घटना घडू लागल्याने शहरवासियांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वर्दळीच्या ठिकाणीही सुरक्षेचा अभाव दिसून येत आहे. शांत शहर म्हणून आपलं वेगळंपण जपणाऱ्या वणी शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावू लागली आहे. यावर वेळीच नियंत्रण न मिळविल्यास कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर काल २० जूनला रात्री १० वाजताच्या सुमारास मारहाणीचा थरार पहायला मिळाला. शिवतीर्थ चौक पोलिस स्टेशन पासून अगदीच हाकेच्या अंतरावर आहे. येथे तिघे जन एकाला बेदम मारहाण करीत होते. शेकडोंचा जमाव या ठिकाणी जमला होता. चित्रपटातील मारहाणीचं चित्तथरारक दृश्य बघावं तसे सगळे जन ती मारहाण बघत होते. तिघे जन एकाला अक्षरशः कुटत असतांना जमलेले नागरिक केवळ बघ्याची भूमिका घेत होते. यावरून वर्दळीच्या ठिकाणीही मनुष्य किती सुरक्षित आहे, याची प्रचिती येते. जवळपास १० ते १५ मिनिटांनी पोलिस त्याठिकाणी आले. पोलिसांनी त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांना हाकलून लावत कायदा सुववस्था बिघडविणाऱ्या त्या तिघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी पोहचण्यास आणखी जरा वेळ केला असता तर चित्र काही वेगळंच दिसलं असतं. 

शहरात दहशत पसरविण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. अपप्रवृत्तीचे लोकं शहरात धुमाकूळ घालू लागले आहेत. त्यामुळे डीबी पथकाने आपली पूर्वी सारखी वचक निर्माण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. पूर्वी डीबी पथकाचा शहरात वेगळाच दरारा होता. गुन्हेगारीवर त्यांचं नियंत्रण होतं. त्यांच्या कार्यवाहीने गुन्हेगारांचाही थरकाप उडायचा. मारहाणीची कधी घटना घडलीच तर त्यांना पोलिसी खाक्या दाखविण्यात त्यावेळीचं डीबी पथक कुणाचीही मुरवत करीत नव्हतं. त्या डीबी पथकाची पुनरावृत्ती होणं आता गरजेचं झालं आहे. पोलिसांची वचक निर्माण होणं गरजेचं झालं आहे. अन्यथा अपराधीक कारवाया वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी