गरीब व श्रीमंतीची दरी शिक्षण क्षेत्रात निर्माण होऊ नये म्हणून शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल करायला हवा... बीडीओ किशोर गज्जलवार


प्रशांत चंदनखेडे वणी 

श्रीमंत व गरीब हा विरोधाभास आपल्या देशात फार पूर्वी पासून चालत आला आहे. गरीब व श्रीमंत यांच्यात जशी दरी आहे, तशीच दरी शिक्षण क्षेत्रातही दिसून येत आहे. खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा व मराठी माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये अशीच दरी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायला हवे. नगर परिषद व जिल्हा परिषद शाळांमधून दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. त्याकरिता शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल करून शिक्षणाचा दर्जा सुधारल्यास मराठी शाळांचेही भविष्य उजळण्यास वेळ लागणार नाही. आजच्या अद्यावत शिक्षण व्यवस्थेत प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थी घडविण्याचे प्रामाणिक काम केल्यास ते विद्यार्थी, पालक व शाळांसाठीही फायद्याचे ठरेल, असे शिक्षण क्षेत्रातील मतभिन्नतेवर प्रकाश टाकणारे मनोगत वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी व्यक्त केले. ते मंदर येथील पोद्दार लर्निंग स्कुल येथे घेण्यात आलेल्या वणी तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या सभेत प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. 

पोद्दार लर्निंग स्कुल येथे मुख्याध्यापकांची आढावा सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर हे होते. तर व्यासपीठावर विस्तार अधिकारी प्रकाश नगराळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. या आढावा सभेचे प्रास्ताविक विषय तज्ज्ञ विनोद नासरे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळा पूर्व तयारी मेळावा २, नाविन्यपूर्ण उपक्रम, वर्ग १ ते ३ च्या माता पालकांसाठी माता पालक गट तथा मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान या विषयी संपूर्ण माहिती देऊन त्यावर मार्गदर्शन केले. सभेला उपस्थित सतीश कुरेकार यांनी ऑन लाईन यु-डायस वर आधार कार्ड नोंदणी कशी करावी या विषयी माहिती दिली. तसेच देवराव चिडे, रमेश बोबडे व प्रकाश नगराळे यांनीही यावेळी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ही शिक्षकांची जबाबदारी असून शिक्षकांनी नाविन्याची कास धरणे गरजेचे असल्याचे मनोगत आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता निलेश बावणे व सुरज चौधरी यांनी सहकार्य केले. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी