प्रेम नगर परिसरात पोलिसांनी राबविली तपासणी व चौकशी मोहीम


प्रशांत चंदनखेडे वणी 

प्रेम नगर परिसरात पोलिसांनी आज २२ जूनला तपासणी व चौकशी मोहीम राबविली. प्रेम नगर परिसर हा देह विक्री करणाऱ्या महिलांची वस्ती म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी वेश्या व्यवसायिक महिलांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या या महिलांमध्ये अल्पवयीन मुली तर नाही ना, याची चाचपणी करण्याकरिता पोलिसांकडून या परिसराची चौकशी व महिलांची तपासणी करण्यात आली. जवळपास ४२ वेश्या व्यवसायिक महिलांची चौकशी करून त्यांचे आधारकार्ड तपासण्यात आले. ही तपासणी मोहीम ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे, एपीआय दत्ता पेंडकर, पीएसआय प्रविण हिरे व पोलिस पथकाने राबविली. 

लालगुडा हद्दीतील प्रेम नगर परिसरात वेश्या व्यवसायिक महिलांनी आपले बस्तान मांडले आहे. या ठिकाणी देहविक्री करणाऱ्या महिलांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य दिसून येतं. या महिला ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून देह विक्री करतात. प्रेम नगर परिसरात देह विक्रीचा हा व्यवसाय चांगलाच फळाफुलाला आला आहे. देह विक्रीच्या व्यवसायात रूढलेल्या काही महिला गरीब व लाचार महिलांना कधी आमिषे देऊन तर कधी धमकावून या काळ्या धंद्यात ओढतात. त्यांच्याकडून देह विक्री करून घेतात. काही देह विक्रीचं रॅकेट चालविणाऱ्या महिला अल्पवयीन मुलींनाही या धंद्यात ओढून त्यांचं जीवन उद्धवस्त करतात. महिला व मुलींना जबरदस्ती येथे आणून शरीर विक्री करण्यास भाग पाडलं जातं असल्याचा पोलिसांना संशय आल्याने अशा महिलांची या व्यवसायातून सुटका करण्याकरिता वणी पोलिसांकडून प्रेम नगर परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात आली. प्रेमनगर परिसरात बस्तान मांडून देह विक्री करणाऱ्या महिलांची पोलिसांनी कसून चौकशी करीत त्यांचे आधार कार्ड तपासले. अल्पवयीन मुलींकडून तर हा व्यवसाय करून घेतला जात नाही ना, याची देखील पोलिसांनी चौकशी केली. तसेच गरीब व लाचार महिलांना या ठिकाणी आणून त्यांना जबरदस्ती या व्यवसायात तर लोटले गेले नाही ना, याची देखील पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. पण या ठिकाणी असा कोणताही प्रकार आढळून न आल्याने पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी