अल्पवयीन मुलगी शेजाऱ्याला म्हणायची मामा, पण त्याने मानलेल्या नात्याला फासला काळिमा


प्रशांत चंदनखेडे वणी 

विवाहित पुरुषाची त्याला मामा म्हणणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवरच वासनांध नजर फिरली. त्याने घरी एकटी असलेल्या या मुलीला अलगद हेरून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. पण मुलीने याला विरोध करताच त्याने तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या धमकीमुळे मुलगी पुरती घाबरली. तिला काही सुचेनासे झाले. तिच्या धास्तावलेल्या अवस्थेचा फायदा घेत त्याने तिला आतल्या खोलीत नेऊन तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच याबाबत कुठेही वाच्यता केल्यास तुझ्या भावाला जीवानिशी ठार मारेन, अशी त्याने धमकीही दिली. त्यामुळे नराधमाच्या वासनेचा शिकार होऊनही तिने आई, वडील व भावाला हा घडलेला प्रकार सांगितला नाही. परिणामी आरोपीची हिम्मत आणखीच वाढली. त्याने ती घरी एकटी असतांना तिला हेरने सुरु केले. भावाला जीवे मारण्याची धमकी देत तो तिचे वारंवार शारीरिक शोषण करू लागला. अशातच तिला गर्भधारणा झाली. त्यानंतर कुठे हा प्रकार समोर आला. एक वर्षापासून तो तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत आपली शारीरिक भूक भागवत होता. कुटुंबीयांना जेंव्हा हा प्रकार कळाला तेंव्हा त्यांना चांगलाच धक्का बसला. मुलीच्या आईने सरळ मुलीला घेऊन पोलिस स्टेशन गाठले. तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या वासनी प्रवृत्तीच्या पुरुषा विरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध अत्याचार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. 

वणी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. आरोपी हा मुलीच्या घराशेजारीच रहात असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये शेजारी संबंध होते. त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे येणेही होते. मुलगी आरोपीला मामा म्हणायची. तो विवाहित असून त्याला दीड वर्षाची मुलगी देखील आहे. दरम्यान त्याची पत्नी परत गर्भवती राहिली. त्यामुळे तो वासनेने पिसाळला होता. ८ फेब्रुवारी २०२२ ला १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना आरोपी तिच्या घरी गेला. तिला आपल्या बाहुपाशात जखडले. तिने मामा हे काय करता म्हणत त्याच्या या कृत्याला प्रखर विरोध केला. पण त्याने तिच्या भावाला हानी पोहचविण्याची धमकी दिली. या प्रकाराबाबत कुठे वाच्यता केल्यास किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याला विरोध केल्यास तुझ्या भावाला जीवानिशी ठार मारेन, अशी धमकी त्याने त्या अल्पवयीन मुलीला दिली. अशातच ती मुलगी भेजारलेली असतांना त्याने तिला आतल्या खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर भावाला जीवे मारण्याची धमकी देत तो तिच्यावर वारंवार अत्याचार करीत होता. दरम्यान तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर तो आणखीच निर्धास्त झाला. आपल्या संबंधाबाबत तुझ्या आईला  कळाल्यास ती आत्महत्या करेन, ही धास्ती भरवत त्याने सतत एक वर्ष तिचं शारीरिक शोषण केलं. अशातच तिला गर्भधारणा झाली. तिला मळमळ व उलट्या होऊ लागल्याने तिची नागपूर येथील रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यावेळी ती २० आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. हे समजताच कुटुंबियांना चांगलाच धक्का बसला. कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत विचारले असता तिने आपबिती कथन केली. तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाने व्यथित झालेल्या मुलीच्या आईने तिला घेऊन सरळ पोलिस स्टेशन गाठले, व २३ जूनला आरोपी विरोधात अत्याचाराची तक्रार नोंदविली. निरागस अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करीत तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या आरोपी विरुद्ध पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६(२)(N), ५०६ व सहकलम ४,६ बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी