मजुरांच्या निवाऱ्यातून उचलून नेत ५० वर्षीय महिलेवर केला अत्याचार, पोलिसांनी चारही आरोपींना केली अटक


प्रशांत चंदनखेडे वणी 

राजूर कॉलरी येथील चुना भट्ट्यावर काम करणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना काल २८ जूनला सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. या महिलेला चुना भट्टा परिसरातील मजुरांच्या निवाऱ्यातून उचलून नेत तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आला. या घटनेने तालुका हादरला असून महिलेला जबरदस्ती उचलून नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिलेला एका खाजगी वाहनात जबरदस्ती बसवून करणवाडी मार्गे नवरगाव शेत शिवारात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. याबाबत महिलेने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अवघ्या काही तासांतच महिलेशी कुकर्म करणाऱ्या चारही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर अत्याचार व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे शहरातील एका प्रतिष्ठित व्यवसायीकडे कामाला असल्याची माहिती समोर आली आहे. 

राजूर कॉलरी येथील एका चुना भट्टयावर काम करणारी ही महिला कामगारांकरिता बांधण्यात आलेल्या निवाऱ्यात रहात होती. आरोपी हे सायंकाळी मजुरांच्या वस्तीत गेले, व या महिलेला जबरदस्ती ओढत नेत कारमध्ये बसविले. सुरवातीला कार वणी मुकुटबन मार्गावरील बियरबार समोर थांबवून तिला जबरदस्ती दारू पाजण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर कार खडकी (बुरांडा) वरून करणवाडी मार्गे नवरगावला नेऊन शेत शिवारात या महिलेवर अतिप्रसंग करण्यात आला. या महिलेसोबत अनैसर्गिक कृत्य देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे. एका ५० वर्षाच्या वयस्क महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याने तालुका हादरला आहे. या महिलेला मजुरांच्या निवाऱ्यातून उचलून नेत तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपींनी मनसोक्त दारुची नशा करून तसेच महिलेलाही जबदस्ती दारू पाजून तिच्यावर पाशवी अत्याचार केला. महिलेने कशीबशी आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेत पोलिस स्टेशन गाठले. तिने पोलिसांसमोर आपबिती कथन करीत चार नराधमांनी अत्याचार केल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जलद तपासचक्रे फिरवून अवघ्या काही तासांतच महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये विठ्ठल ज्ञानेश्वर डाखरे (३९) रा. टागोर चौक, कपिल व्यंकटेश अंबलवार (३५) रा. जैताई नगर, मनोज अजाबराव गाडगे (४७) रा. रामपुरा वार्ड, वैभव घनश्याम गेडाम (२२) रा. आय.टी. आय. जवळ लालगुडा यांचा समावेश असून त्यांच्यावर भादंवि च्या कलम ३५४, ३५४ (अ),(१)(एक), ३६६, ३७६(ड), ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महिलेच्या मुलाशी यातील एका आरोपीचे आर्थिक व्यवहार होते. त्याच्या शोधात तो आपल्या सहकाऱ्यांना घेऊन मजुरांच्या वस्तीत गेला. त्यावेळी त्याची आई घरी होती. तिने मुलगा घरी नसल्याचे सांगितले. पण आरोपींची महिलेवरच नियत फिरली. त्यांनी त्या ५० वर्षीय महिलेला जबरदस्ती कारमध्ये बसवून नवरगाव शेत शिवारात नेत तिच्यावर अतिप्रसंग केला. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे महिला किती सुरक्षित आहेत, हे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा गतिशील तपास करून अवघ्या काही तासांतच कारसह चारही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी हे शहरातील एका प्रतिष्ठित व्यवसायिकाकडे कामाला असल्याची माहिती समोर आली आहे. 

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, एपीआय माया चाटसे, सपोनि माधव शिंदे, सपोनि आशिष झिमटे, पोलिस शिपाई विजय वानखेडे, अमोल नुनेलवार, शुभम सोनुले, रवी इसनकर यांनी केली. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी