एन.बी.एस.ए. महाविद्यालयात कला व वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश देणे सुरु
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील नगर परिषद शाळा क्रमांक ७ जवळ असलेल्या एन.बी.एस.ए. कला व वाणिज्य महाविद्यालयात कला व वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश देणे सुरु आहे. हे महाविद्यालय शहराच्या अगदी मध्यभागी असून सर्व सोइ सुविधांनी सज्ज आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचीही सुविधा याठिकाणी उपलब्ध आहे.
महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाशी संलग्नित तथा नूरजहाँ बेगम चॅरिटेबल ट्रस्ट वणी द्वारा संचालित एन.बी.एस.ए. कला व वाणिज्य महाविद्यालयात बी.ए. व बी.कॉम पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. कला व वाणिज्य शाखेत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाकरिता प्रवेश देणे सुरु आहे. १२ वी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना कला व वाणिज्य शाखेत करिअर घडवायचे आहे, त्यांनी त्वरित एन.बी.एस.ए. महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता या महाविद्यालयात स्कॉलरशिपचीही सुविधा उपलब्ध आहे. बी.ए. व बी.कॉम पदवी प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक वेळ न दवडता एन.बी.एस.ए. महाविद्यालयात प्रवेश निश्चित करून घ्यावा.
अधिक माहिती करिता 7498200475 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा
Comments
Post a Comment