मराठीबाणा मराठी माणसाच्या नसानसात भिनवणारा मराठमोळा राजकारणी राजूभाऊ उंबरकर यांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

(जाहिरात)

प्रशांत चंदनखेडे वणी 

राजुभाऊ उंबरकर हे नाव आता जनतेसाठी आन्यायाविरुद्धचा आवाज बनलं आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा नेता म्हणून राजूभाऊ उंबरकर यांना ओळखलं जातं. हक्क व अधिकाराने राजूभाऊ यांच्याजवळ आपल्या व्यथा मांडणाऱ्या जनतेची त्यांच्याशी आता नाळ जुळली आहे. 'शासकीय व प्रशासकीय स्तरावर जर कुणी जनतेच्या कामात आणत असेल बाधा तर जनताही छाती ताणून म्हणते आमच्या पाठीशी आहे राजूदादा.' असं एक हक्काचं नातं या हक्काच्या नेत्यासोबत जुळलं आहे. जनतेच्या समस्या जाणून घेणारा नेता म्हणून राजूभाऊंना मानलं जातं. कुणावरही अन्याय झाला तर आधी राजूभाऊंकडे धाव घेतली जाते. जनतेचे कोणतेही प्रश्न असो ते सोडविण्यास नेहमी तत्पर असलेला नेता म्हणून राजू उंबरकर यांचं नाव जनतेच्या मुखावर येतं. जनतेवर अन्याय करणाऱ्यांविरुद्ध पेटून उठणारा नेता म्हणजे राजू उंबरकर हे समीकरणच बनलं आहे. राजकारण व समाजकारण यांचं उत्कृष्ठ मेळ साधणारा नेता म्हणजेच राजू उंबरकर, संकटात मदतीला धावून जाणारा नेता म्हणजे राजू उंबरकर, महिलांचा भाऊराया म्हणजे राजू उंबरकर, दुर्बलांना मदतीचा हात देणारा मदतगार म्हणजे राजू उंबरकर, समाजकार्यात नेहमी अग्रेसर असलेलं समाजशील व्यक्तिमत्व म्हणजे राजू उंबरकर, जनतेच्या न्याय, हक्क व अधिकारांसाठी रस्त्यावर उतारणारं व्यक्तिमत्व म्हणजे राजू उंबरकर, कास्तकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करणारी तोफ म्हणजे राजू उंबरकर. राजू उंबरकर यांचा नीतिमत्तेच्या मार्गाने १६ वर्षांपासून राजकीय प्रवास सुरु आहे. त्यांनी १६ वर्षाच्या राजकारणात मराठी माणसाची अस्मिता जपली. मानवी दृष्टीकोन हा त्यांच्या राजकारणाचा गाभा राहिला आहे. आजही तळागाळातला कार्यकर्ता त्यांच्याशी सच्चा मनानं जुळला आहे. मराठी बाणा मराठी माणसाच्या नसानसात भिनवणारा मराठमोळा राजकारणी म्हणजे राजू उंबरकर हा हुंकार जनतेत भरला आहे. माणसं जोडण्यावर भर देणाऱ्या राजू उंबरकर यांनी मानवी हिताचं राजकारण केलं. 'जनतेवर झाला अन्याय तर राजू उंबरकर हाय, हा नाराच बुलंद झाला.' जनतेचा पाठीराखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजू उंबरकर यांच्या दरबारात नागरिकांच्या तक्रार निवारणाचं काम केलं जातं. माणसाच्या हिताचं राजकारण करणारा नेता म्हणून राजू उंबरकर यांना जनतेतूनच मान्यता मिळाली आहे. राजकारण व समाजकारण याचा उत्कृष्ठ मेळ घालत त्यांनी जिल्ह्यात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना उदयास आली नी राजुभाऊ उंबरकर यांनी राजकारणाची दोर आपल्या हाती घेतली. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी राजकारणात उतरलेल्या राजुभाऊ यांनी मराठी माणसात मराठी बाणा जागविला. परप्रांतीयांची दहशत कायमची संपविण्याकरिता मराठी तरुणांची एकजूट केली. मराठी माणसात हिंमत भरण्याचं काम त्यांनी हाती घेतलं. त्यांच्या नेतृत्वात मराठी चळवळ उभी राहिली. तालुक्यातील मराठी माणूस हिंमतीने पेटून उठला. परप्रांतीयांच्या दहशतीला मराठी तरुणांनी तगडं आव्हान दिलं. आणि कालांतराने परप्रांतीयांची दहशत नाहीशी झाली. मराठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम राजूभाऊ उंबरकर यांनी हाती घेतलं. कास्तकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून शासन प्रशासनाला शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडलं. वणी उपविभागातील जनतेचे प्रश्न व समस्या सोडविण्याकरिता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. गरजूंना मदतीचा हात दिला. नैसर्गिक आपत्तीत सर्वकाही गमावून बसलेल्या नागरिकांना तन, मन, धनानं सहाय्यता केली. दुष्काळी परिस्थित कास्तकारांना मोफत बियाणं वाटप केलं. शहरात कृत्रिम पाणी टंचाई व दूषित पाण्याचा पुरवठा होत असतांना त्यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला. दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या गरिबांचा त्यांनी उपचाराचा खर्च उचलला. गरिबांच्या मुलांचा त्यांनी शिक्षणाचा खर्च उचलला. कर्तृत्वाने उंच भरारी घेऊ इच्छिणाऱ्यांच्या पंखात बळ भरण्याचं काम त्यांनी केलं. असा हा जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा राजूभाऊ जनतेच्या गळ्यातील टाईत झाला आहे. 

असा हा सर्वसामान्य जनतेचा नेता असलेला व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही नेता झालेला राजूभाऊ उंबरकर यांचा  अभिष्टचिंतन सोहळा साजरा होत आहे. विदर्भाचा ढाण्या वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजूभाऊ उंबरकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! त्यांना निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा त्यांच्या चाहत्यांमधून व्यक्त होत आहे.   

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी