प्रशांत चंदनखेडे वणी
कोळसाखाणीत कोळशाचे ट्रक भरण्यावरून कोळसा व्यावसायिकांमध्ये झालेला वाद चिघळला. आणि त्याचे पर्यवसान काल रात्री हाणामारीत झाले. कोळसा व्यवसायातील स्पर्धेतून संघर्षाची ठिणगी उडाली व कोळसा व्यवसायिकांचे झुंड एकमेकांशी भिडले. एकमेकांवर लाठ्या काठ्या उगारण्यात आल्या. कोळसा व्यवसायिकांमध्ये तुंबळ हाणामारी सुरु असतांनाच पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठले, व राडा करणाऱ्या ५ आरोपींना जेरबंद केले. काही आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. पण पोलिसांनी त्यांचा शोध लावला असून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. झुंडीने येऊन हाणामारी करणाऱ्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
वणी तालुक्यात व तालुक्यालगत अनेक कोळसाखानी असल्याने येथे कोळशाचा बाजार गरम आहे. कोळसा व्यवसायात अनेकांनी उडी घेतल्याने या व्यवसायात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. या व्यवसायात भाईगिरी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भाईगिरीच्या आवेशात एकमेकांवर कुरघोडी करण्याची जणू स्पर्धाच या व्यवसायात सुरु झाली आहे. कोळशाच्या या काळ्या धंद्यात काळे कारनामेही मोठ्या प्रमाणात चालतात. कोळशाच्या काळ्या धंद्यातून अनेक जन गळेलठ्ठ झाले आहेत. कोळशाचं काळं साम्राज्य चालविणाऱ्यांचे येथे रात्रीचे खेळ रंगतात. काळ्या रात्रीत काळ्या कोळशाचे रूपांतर काळ्या पैशात केले जाते. त्यामुळे कोळसा व्यवसायिकांमध्ये मालदार होण्याच्या सुरु झालेल्या स्पर्धेतून संघर्षाची ठिणगी उडू लागली आहे. कोळसा व्यवसायात कुणी वरचढ होण्याचा प्रयत्न केल्यास समूहाने येऊन त्याला धमकावणे व मारहाण करणे हा कोळसा व्यावसायिकांचा नेहमीचाच प्रकार झाला आहे. झगडे व मारहाणीच्या तुरळक घटना कोळसा व्यवसायात नित्याच्याच झाल्या आहेत. कोळसा व्यवसाय व कोळशाच्या काळ्या धंद्यात दबंगगिरी प्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणात उतरले आहे. कोळसा व्यवसाय व कोळशाच्या काळ्या धंद्यात कुणी वरचढ होण्याचा प्रयत्न केल्यास ते एकमेकांविरुद्ध उभे ठाकतात. शाब्दिक चकमकीतून प्रकरण न निवळल्यास झुंडीने येऊन एकमेकांना मारहाण केली जाते. वणी येथील वणी लगत असलेल्या माजरी येथील कोळसा व्यवसायिकांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद फणफणत होता. यातच दोन दिवसांपूर्वी एकोना कोळसाखाणीत कोळशाचे ट्रक भरण्यावरून या कोळसा व्यवसायिकांमध्ये आणखी वाद चिघळला. कोळसाखाणीत शाब्दिक चकमक उडाल्यानंतर काल १ जुलैला रात्री ११ वाजता मारोती व्हॅन व बुलेरो या वाहनांमधून काही जन मेघदूत कॉलनी येथे आले. या ठिकाणी कोळसा व्यावसायिकांचे दोन समूह एकेमकांविरुद्ध उभे ठाकले. त्यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही समूहांनी एकमेकांवर लाठ्या काठ्या उगारल्या. हा राडा सुरु असतांनाच पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठले. राडा घालणाऱ्यांपैकी काही जन पळत सुटले तर पाच आरोपी पोलिसांच्या हाती लागले.
पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींमध्ये मतीन अहेमद (३५) रा. बोधे नगर चिखलगाव, अनवर खान (४१), मो. अतिक (२७), मो. जमीर (२१), तिघेही राहणार राजूर, मो. आरिफ सगीर (२६) रा. माजरी यांचा समावेश असून त्यांच्यावर भादंवि च्या कलम १७३, १७४, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटना स्थळावरून पळून गेलेल्या आरोपींचाही पोलिसांनी शोध लावला असून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात सपोनि आशिष झिमटे करीत आहे.
No comments: