अक्षय भालेराव या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ आज वणी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
प्रशांत चंदनखेडे वणी
नांदेड जिल्ह्यातील बोंढर (हवेली) या गावातील तरुणाची जातीयवादी मानसिकतेतून अतिशय निर्दयीपणे हत्या करण्यात आली. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असून आंबेडकरी चळवळीतील या तरुणाची हत्या करणाऱ्या समाजद्रोह्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण राज्यातून होऊ लागली आहे. जातीयवादी मानसिकता जोपासणाऱ्यांनी पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लावण्याचे काम केले असून जातीभेद पाळणाऱ्या समाज कंटकांना फासावर चढवण्याचा जनआक्रोश प्रत्येक गाव, शहर व जिल्ह्यातून होऊ लागला आहे. या पँथर तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ आज वणी येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंबेडकरी जन आंदोलन कृती समितीच्या माध्यमातून तहसील कार्यालयासमोर हे निषेध धरणे आंदोलन केलं जाणार आहे.
अक्षय भालेराव या तरुणाची जातीयवादी मानसिकतेतून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गावात जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून जातीवादाने पछाडलेल्या लोकांनी बेसावध असलेल्या अक्षयची निर्दयीपणे हत्या केली. बोंढर (हवेली) या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कधीही साजरी झाली नव्हती. यावर्षी अक्षय भालेराव या तरुणाने पुढाकार घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची थाटात जयंती साजरी केली. हे जातीवाद्यांच्या मनात खुपलं. त्यांनी अक्षय भालेराव हा बेसावध असतांना त्याची धारदार शस्त्राने भोकसून हत्या केली. अक्षय भालेराव हा आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता होता. जातीयवादी मानसिकतेतून त्याची हत्या करण्यात आल्याने त्याचे तीव्र पडसाद राज्यात उपटले. जनमानसात संतापाची लाट उसळी. अक्षय भालेराव याच्या हत्येने समाजमन हेलावले. त्याच्या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यात जन आक्रोश उसळला. प्रत्येक गाव, शहर व जिल्ह्यातून या निष्पाप तरुणाची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होऊ लागली. आज वणी येथे अक्षय भालेराव या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ आंबेडकरी जन आंदोलन कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मानवतावादी दृष्टिकोन जोपासणाऱ्या नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
Comments
Post a Comment