प्रशांत चंदनखेडे वणी
एका विवाहित महिलेने स्वतःला जाळून घेतल्याने आज १० जुलैला तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेने रविवारी आपल्या राहत्या घरी स्वतःला जाळून घेतले. दरम्यान तिच्या किंचाळ्या ऐकून कुटुंबीय व शेजाऱ्यांनी धाव घेत आग विझविली व तिला प्रथम शहरातील एका रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने महिलेला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. आज सकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नवरगाव (उमरी) येथे ही घटना घडली. सरस्वती दिनेश चार्लीकर (३५) असे या स्वतःला पेटवून घेतलेल्या महिलेचे नाव आहे.
मृतक महिला ही आपल्या पती व मुलाबाळांसह नवरगाव (उमरी) येथे रहात होती. ९ जुलैला पहाटे ४ ते ४.३० वाजताच्या सुमारास तिने वरच्या माळ्यावर जाऊन स्वतःला पेटवून घेतले. आगीच्या ज्वाळांनी तिला घेरल्यानंतर ती ओरडू लागल्याने कुटुंबीय व शेजारी मदतीला धावले. आग विझवून त्यांनी तिला शहरातील एका रुग्णालयात दाखल केले. पण ती गंभीररीत्या भाजल्या गेल्याने प्रकृती आणखीच अत्यवस्थ होऊ लागली. त्यामुळे तिला चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. चंद्रपूर येथील रुग्णालयात महिलेवर उपचार सुरु असतांना आज १० जुलैला सकाळी तिने अखेरचा स्वास घेतला. तिने स्वतःला आगीच्या हवाली का केले हे अद्याप कळू शकले नाही. पोलिस तपासात ते लवकरच निष्पन्न होईल. सरस्वती हिच्या पश्चात पती व दोन मुली असा आप्त परिवार आहे. तिच्या अशा या अकाली जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


No comments: