प्रशांत चंदनखेडे वणी
मारोती ओमनी कारला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात कार मधील तिघे जन जागीच ठार झाले. तर एक जन गंभीर जखमी झाल्याची घटना आज ११ जुलैला सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मारेगाव यवतमाळ राज्य महामार्गावरील कोठोडा गावाजवळ घडली. नागपूर वरून वृत्तपत्रांची पार्सल घेऊन येणारी ही कार पांढरकवडा येथे जात असतांना हा भीषण अपघात झाला. यात कारचा समोरील भाग पूर्णतः चेंदामेंदा झाला आहे.
नागपूर वरून दररोज वृत्तपत्रांची पार्सल घेऊन येणारी मारोती ओमनी कार (MH ३४ K १९५४) मारेगाव येथे पार्सल देऊन पांढरकवड्याकडे जात असतांना कोठोडा गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. यात कार मधील तिघाजणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जन गंभीर जखमी झाला आहे. या कारमध्ये चालक, वाहक यांच्यासह दोन प्रवासी होते. पांढरकवडा पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी शीघ्र घटनास्थळ गाठून कारमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढत जखमीला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. कारला धडक देऊन ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे मात्र अद्याप कळू शकली नाही. धडक एवढी भीषण होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.


No comments: