प्रशांत चंदनखेडे वणी
वणी शहरापासून काही अंतरावरच असलेल्या लालगुडा हद्दीत वसलेला प्रेम नगर परिसर देहव्यापार करणाऱ्या महिलांची वस्ती म्हणून ओळखला जातो. वणी तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात हा कुंटणखाना कुप्रसिद्ध आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या या महिलांच्या वस्तीला प्रेम नगर म्हणून ओळखले जाते. याठिकाणी काही महिला स्वतःहून देहविक्री करतात. तर काही हालाकीच्या परिस्थितीने बेजार होऊन या व्यवसायात ओढल्या गेल्या आहेत. तर काहींना जबरदस्ती हा व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले आहे. गरिबी, लाचारी व तिरस्कार सोसावा लागलेल्या महिलांनी खास करून देहविक्रीचा पर्याय निवडला. पण काही अशाही महिला आहेत, ज्या सुख चैन भोगण्याकरिता या व्यवसायात उतरल्या आहेत. प्रेम नगर परिसरात वेश्या व्यवसायिक महिलांचे दलालही दिसून येतात. हे दलाल गरीब, लाचार महिलांबरोबरच अल्पवयीन मुलींनाही पैशाचे आमिष दाखवून या धंद्यात ओढतात. अल्पवयीन मुलींना देहविक्री करण्यास हे दलाल भाग पडतात. प्रेम नगर परिसरात अल्पवयीन मुलींकडून देहविक्री करवून घेत असल्याची गोपनीय माहिती नागपूर येथील एनजीओला मिळाल्यानंतर एनजीओच्या टीमला सोबत घेऊन ठाणेदार अजित जाधव यांनी प्रेम नगर परिसरात काल १३ जुलैला धाड टाकली. या परिसरातील प्रत्येक निवाऱ्याची तपासणी करण्यात आली. दरम्यान वेश्या व्यवसायात जबरदस्ती ओढल्या गेलेली एक २२ वर्षीय महिला समोर आली. एका व्यक्तीने तिला जबरदस्ती वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे तिने पोलिसांना सांगितले. ती कामाच्या शोधात वणीला आली असता जम्मू खान (२४) रा. खरबडा मोहल्ला नामक इसमाने तिला काम मिळवून देण्याच्या बहाण्याने वेश्या व्यवसायात लोटले. तिला धमकावून देहविक्री करण्यास भाग पाडले. पोलिसांनी तिची या कुंटणखान्यातून सुटका केली आहे. पोलिसांची धाड पडल्याचे आरोपीला कळताच आरोपी तेथून फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहे.
प्रेम नगर परिसरात अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची गोपनीय माहिती नागपूर येथील फ्रिडम फर्म या स्वयंसेवी संस्थेला मिळाली. या संस्थेची टीम वणी पोलिस स्टेशनला आली असता ठाणेदार अजित जाधव यांनी त्यांना सोबत घेऊन प्रेम नगर परिसरात धाड टाकली. वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक महिलांच्या निवाऱ्याची कसून तपासणी करण्यात आली. वेश्या वस्तीत अल्पवयीन मुली तर मिळाल्या नाही. पण या व्यवसायात जबरदस्ती लोटल्या गेलेली २२ वर्षीय महिला मात्र आपली व्यथा मांडण्याकरिता समोर आली. ही महिला कामाच्या शोधात वणीला आली होती. अशातच जम्मू खान नामक इसमाशी तिची भेट झाली. त्याने तिला शब्दांनी आकर्षित करून योग्य ते काम मिळवून देण्याची तयारी दर्शविली. काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तिला प्रेम नगर परिसरात नेऊन वेश्या व्यवसायात लोटले. तिला धमकावून देहविक्री करण्यास भाग पाडले. ही आपबिती तिने पोलिसांना व एनजीओ च्या टीमला सांगितली. पोलिसांनी तिची या कुंटणखान्यातून सुटका केली. तिला जबरदस्ती या व्यवसायात लोटणाऱ्या जम्मू खान नामक इसमाला पोलिस अटक करण्यास गेले असता तो फरार झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याच्यावर भादंवि च्या कलम ३७० व ३,४,७ अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.


No comments: