Latest News

Latest News
Loading...

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवासही राजू उंबरकर यांनी केला सुलभ, महांकालपूर येथील विद्यार्थ्यांसाठी सुरु केली बस सेवा

प्रशांत चंदनखेडे वणी 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांना नेहमीच जनतेप्रती कळवळा राहिला आहे. जनतेचे प्रश्न व समस्या सोडविण्याची त्यांची तळमळ आजही तेवढीच प्रखर आहे. त्यामुळे नागरिक हक्काने आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे येतात. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणारे राजू उंबरकर हे नागरिकांच्या हक्काचे नेते झाले आहेत. समस्या कोणतीही असो, राजू उंबरकर ते सोडवितातच असा दृढ विश्वास जनतेचा झाला आहे. आणि म्हणूनच हताश झालेले नागरिक राजू उंबरकर यांच्याकडे धाव घेतांना दिसतात. आता तर विद्यार्थीही राजू उंबरकर यांच्याकडे येऊन आपल्या व्यथा मांडू आहेत.  अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरातील शाळांमध्ये शिक्षण घेण्याकरिता येतात. पण गावातून शहरात येण्याकरिता बसची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाणे येणे करतांना मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. 

तालुक्यातील महांकालपूर या गावातुन बस सेवा सुरु नसल्याने शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल होत आहे. महांकालपूर या गावातून प्रवासाकरिता बसची सुविधा उपलब्ध नसल्याने शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाणे येणे करतांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी राजू उंबरकर यांच्याकडे धाव घेत आपली कैफियत मांडली. राजू उंबरकर यांनीही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करता त्वरित वणी आगार व्यापस्थापकांना फोन करून महांकालपूर या गावातून विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेनुसार बस फेरी सुरु करून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास सुलभ झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. 

महांकालपूर या गावातून राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा बंद होती. या गावातील बहुतांश विद्यार्थी शहरात शिक्षणाकरिता येतात. त्यामुळे त्यांना शाळेत जाणे येणे करतांना चांगल्याच अडचणी निर्माण होत होत्या. अनेक विद्यार्थी हे सामान्य कुटुंबातील असल्याने त्यांच्याकडे शहरात जाणे येणे करण्याकरिता कोणतीही पर्यायी सुविधा उपलब्ध नसल्याने या विद्यार्थ्यांना चांगल्याच हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांनीही जनतेच्या समस्या गंभीरतेने घेणाऱ्या राजू उंबरकर यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्याकडे आपली कैफियत मांडली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करता राजू उंबरकर यांनी लगेच वणी आगार व्यवस्थापकाला फोन लावला. त्यांनी आगार व्यवस्थापकांशी चर्चा करून महांकालपूर येथून विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेनुसार बस फेरी सुरु करून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राजू उंबरकर हे नेहमीच नागरिकांच्या समस्या व प्रश्नांना गांभीर्याने घेतात. त्या सोडविण्याकरिता ते सदैव तत्पर असतात. आणि म्हणूनच कुठलीही समस्या असली की नागरिक त्यांच्याकडे धाव घेतात. 

No comments:

Powered by Blogger.