प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर एलसीबीची कार्यवाही, सुगंधित तंबाखूचा साठा जप्त
प्रशांत चंदनखेडे वणी
प्रतिबंधित सुंगंधीत तंबाखूची अवैध विक्री करिता वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने कार्यवाही करून मालवाहु वाहनासह ४ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरात अवैध विक्री करिता सुगंधित तंबाखाची खेप घेऊन येणाऱ्या वाहन चालकालाही पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही १९ जुलैला रात्री दरम्यान करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात अवैध धंद्यांबाबत माहिती गोळा करीत असतांना त्यांना एका मालवाहू वाहनातून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची शहरात अवैध विक्री करिता वाहतूक करण्यात आली असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मालवाहू वाहन हे आदर्श शाळेजवळ उभे असल्याचेही पोलिसांना सांगण्यात आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री आदर्श शाळेजवळ जाऊन पाहणी केली असता त्यांना सांगितलेल्या वर्णनाचे मालवाहू वाहन (MH २९ BE ४७५५) त्याठिकाणी उभे दिसले. पोलिसांनी वाहन चालकाला वाहनात भरून असलेल्या मालाबाबत विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वाहनाची झडती घेतली असता वाहनात तीन पांढऱ्या रंगाच्या पोत्यांमध्ये माझा या सुगंधित तंबाखूचे डब्बे असलेले बॉक्स आढळून आले. तिन पोत्यांमध्ये २०० ग्राम वजनाचे एकूण १२० डब्बे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी या कार्यवाहीत सुगंधित तंबाखूचे १२० डब्बे किंमत १ लाख १२ हजार २०० रुपये, एक मोबाईल व मालवाहू वाहन असा एकूण ४ लाख १२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहरात अवैध विक्रीकरिता प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची खेप घेऊन येणाऱ्या वाहन चालक शंकर बाबाराव खोडे (५४) रा. कात्री ता. कळंब जी. यवतमाळ याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर अन्न सुरक्षा मानके कायदा २००६, नियम व नियमने २०११ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने हा प्रतिबंधित सुंगंधीत तंबाखू यवतमाळ येथील शैलेश गाडेकर यांच्या मालकीचा असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याने हा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू शहरात अवैध विक्री करिता आणल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, पोहवा सुनील खंडागळे, योगेश डगवार, पोना सुधीर पांडे, भोजराज करपते, निलेश निमकर, सुधीर पिदूरकर, रजनीकांत मडावी, चालक सतीश फुके यांनी केली.
Comments
Post a Comment