शाब्दिक वादातून चौघांनी एकाला केली लाकडी दांड्याने मारहाण
प्रशांत चंदनखेडे वणी
शुल्लक कारणावरून गावातीलच दोन युवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर गावातील एका व्यक्तीच्या घरी असलेल्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त दोघेही समोरासमोर आले. परिणामी काही तासांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून सदर युवकाने आपल्या तीन मित्रांसह त्या युवकाला लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत तो जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत त्याने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी चारही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २४ जुलैला मध्यरात्री १२.६० वाजताच्या सुमारास तालुक्यातील नांदेपेरा येथे घडली.
तालुक्यातील नांदेपेरा या गावातील मयूर अरुण खामनकर (२८) या युवकाचा व आरोपीचा २४ जुलैला रात्री १०.३० वाजता शुल्लक कारणावरून वाद झाला. त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर मयूर हा गावातीलच एका व्यक्तीच्या घरी धार्मिक कार्यक्रम बघण्याकरिता गेला असता आरोपीने वाद उकरून काढत आपल्या तीन मित्रांसह मयूरला लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. मयूरला मारहाण होत असतांना त्याचा मित्र अनिकेत चिकटे (२७) हा मध्यस्थी करण्यास आला असता आरोपींनी त्यालाही मारहाण केली. आरोपींनी मयूर व अनिकेत यांना लाकडी दांड्याने मारहाण केल्याने त्यांच्या डोक्याला व पाठीला दुखापत झाली आहे. याबाबत मयूर खामनकर याने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी जितेश मारोती आत्राम (३५), गोलू बंडू कुमरे (३२), प्रदीप रामाजी उईके (२५), मनोज उईके (३५) चौघेही रा. नांदेपेरा यांच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३२४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment