समाज माध्यमांवर व्हायरल व्हिडिओचे उमटू लागले पडसाद, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल


प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील एका प्रतिष्ठित युवा व्यवसायिकाचा रात्री एका मुलीला दुचाकीवर बसवून नेत असतानाचा  व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. नंतर या व्हिडिओचे शहरात चांगलेच पडसाद उमटले. ना ना विध चर्चांना उधाण आले. या व्हायरल व्हिडिओ वरून आंबट गोड चर्चाही शहरात रंगल्या. पण मुली सोबत व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे अपमानित झालेल्या युवा व्यवसायिक व त्यांच्या समर्थकांनी पोलिस स्टेशनला धाव घेत व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत रोष व्यक्त केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातीलच प्रतिस्पर्धी व्यवसायिकाने हा व्हिडिओ व्हायरल केल्याचे समोर आल्यानंतर व्हायरल व्हिडिओतील त्या व्यावसायिकाचा राग अनावर होऊन त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला अटक करण्याची मागणी रेटून धरल्याने पोलिसांनी शीघ्र तपास करून दोघांना चौकशी करिता ताब्यात घेतले. त्यांनीच व्हिडिओ चित्रीकरण व तो व्हायरल केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोघांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यानंतर व्यवसायिकाचा मुलीसोबतचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांनी सदर व्यवसायिकाची माफी मागितल्याचेही सांगण्यात येत आहे.

शहरातील एका नामांकित इलेक्ट्रॉनिक दुकानाचा मालक असलेल्या युवा व्यवसायिकाचा दुकान बंद केल्यानंतर एका तरुणीला दुचाकीवर बसवून नेत असतांनाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. सदर व्यवसायिक हा मुलीला दुचाकीवर बसवून नेत असतांना दोन युवकांनी त्याचा पाठलाग करून त्याला अडविले, व मुलीला घेऊन रात्री कुठे जात आहे, अशी विचारणा केली. दोन युवकांनी दुचाकी थांबविताच मुलगी दुचाकीवरून उतरून पायदळ जाऊ लागल्याचे या व्हिडिओ चित्रीकरणात दिसून येते. परंतु ओळखीतल्या मुलीला औषधी घेण्याकरिता मेडिकलमध्ये नेत असतांना माझ्यावर पाळत ठेऊन असणाऱ्यांनी जाणीव पूर्वक हे व्हिडिओ चित्रीकरण केले असल्याचे सदर व्यवसायिकाने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मुलीला दुचाकीने मेडिकलमध्ये नेत असतानाचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर व्हायरल केल्याने व्यवसायिकाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. प्रतिस्पर्धी व्यावसायिकाने माझी बदनामी करण्याचा हा कुटील प्रयत्न केला असून त्याने माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले असल्याचा आरोप तक्रारकर्त्या व्यवसायिकाने केला आहे. पोलिसांनी सदर व्यवसायिकाच्या तक्रारीवरून व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या व तो व्हायरल करणाऱ्या दोघांवरही भादंवि च्या कलम ३४१, ५०१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींनी व्हिडिओ चित्रीकरण करण्याच्या उद्देशाने व्यवसायिकाचा पाठलाग करण्याकरिता वापरलेली बुलेट किंमत १ लाख १० हजार रुपये, ऍपल कंपनीचा मोबाईल किंमत १ लाख १० हजार रुपये व ओप्पो कंपनीचा मोबाईल किंमत १० हजार रुपये असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय दत्ता पेंडकर करीत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी