इंदिरा चौकातील मटका अड्ड्यावर पोलिसांची कार्यवाही, सट्टा घेणाऱ्या चौघांना अटक, मग राजूर (कॉ.) येथील मटका अड्ड्यांचं काय !
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील इंदिरा चौक परिसरातील एका बियरबार जवळ सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मटका जुगार खेळणाऱ्या चार जनांना अटक केली. इंदिरा चौकातील एका बियरबार जवळ मटका अड्डा चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी राजरोसपणे सुरु असलेल्या या मटका अड्ड्यावर धाड टाकून सट्टा घेणाऱ्या चार सट्टा बहाद्दरांना अटक केली. हे चारही जन मटका पट्टी फाडतांना पोलिसांना रंगेहात सापडून आले. त्यांच्यावर मजुका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शहरापासून अवघ्या ७ किमी अंतरावर असलेल्या राजूर (कॉ.) येथेही मोठ्या प्रमाणात मटका अड्डे चालविले जात असून येथे सट्टा मटक्याचा अवैध व्यवसाय चांगलाच फळाफुलाला आला आहे. येथील शाळाकरी मुलंही सट्टा लावतांना दिसतात. जी.प. शाळेपासून काही अंतरावरच मटका अड्डा सुरु असून पोलिसांचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होतांना दिसत आहे. मजुरदारवर्ग मोठ्या प्रमाणात मटक्याच्या आहारी गेल्याने त्यांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहेत. तरुण व युवा वर्गही मोठ्या प्रमाणात मटक्याच्या आहारी गेला असून पुरुषांबरोबरच महिलाही सट्ट्यावर नशीब आजमावतांना दिसत आहे. अवैध व्यवसायिकांनी राजूर (कॉ.) येथे ठिकठिकाणी मटका अड्डे थाटले आहेत. येथे राजरोसपणे मटका जुगार खेळला जात असतांना बिट जमादार मात्र डोळ्यावर पट्टी बांधून असल्याचे दिसून येत आहे. तरुणांचे आयुष्य व मजुरदारांचे संसार उद्धवस्त करणाऱ्या राजूर (कॉ.) येथील मटका अड्ड्यांवर कार्यवाही करण्याची मागणी येथील रहिवाशांमधून होऊ लागली आहे.
इंदिरा चौकातील एका बियरबार जवळ निर्धास्तपणे चालविल्या जाणाऱ्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी कार्यवाही करून मटका जुगार खेळणाऱ्या चार जनांना अटक केली. मटका पट्टी फाडतांना हे चारही जन पोलिसांना रंगेहात सापडले. एपीआय दत्ता पेंडकर यांनी मटका जुगारावर धाडसत्र अवलंबिले असून त्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकासह इंदिरा चौक येथे सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकली. इंदिरा चौकात राजरोसपणे मटका अड्डा चालवून मटका पट्टी फाडणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या जवळून रोख रक्कम व मटका जुगार खेळण्यासाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले. त्यांच्यावर मजुकाच्या कलम १२(अ), सहकलम १०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही २७ जुलैला दुपारच्या सुमारास करण्यात आली. एपीआय दत्ता पेंडकर, पोलिस शिपाई पुरुषोत्तम डडमल, शुभम सोनुले, सागर सिडाम यांनी ही कार्यवाही केली. राजूर (कॉ.) येथेही अवैध धंद्यांना उधाण आले आहे. अवैध व्यावसायिकांनी येथे ठिकठिकाणी मटका अड्डे सुरु केले आहेत. या मटका अड्ड्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात आहे. शाळा परिसर व धार्मिक स्थळ असलेल्या ठिकाणी मटका अड्डे चालविले जात आहे. प्रमुख बाजारपेठ असलेल्या ठिकाणीही अवैध व्यवसायिकांनी मटका जुगाराचा खेळ सुरु केला आहे. जागोजागी सट्टा मटक्याचे ठिय्ये मांडून सट्टा घेणारी माणसे बसविण्यात आली आहे. राजूर येथे मटका जुगार जोमात सुरु असतांना पोलिस मात्र गांधारीची भूमिका साकारत आहेत. मटका जुगारावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सट्टा मटक्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याच्या येथील नागरिकांच्या तक्रारी आहेत. राजूर (कॉ.) येथील अवैध धंद्यांना आशीर्वाद कुणाचा ही चर्चा आता रंगू लागली आहे. राजूर येथे मटका अड्ड्यांचं जाळं पसरत असतांना बिट जमादार मात्र कार्यवाही करणं विसरत आहे. राजरोसपणे सुरु असलेल्या मटका अड्ड्यांवर कार्यवाही करण्याचं पोलिस धाडस करीत नाही याचंच आश्चर्य वाटतं. सट्टा मटक्याच्या आहारी गेलेला युवावर्ग पैशाची गरज भागविण्याकरिता चुकीच्या मार्गाकडे वळू लागला आहे. मजूरवर्ग आपल्या मेहनतीचा व घामाचा पैसा मटक्यावर उधळू लागला आहे. नोकरदार वर्गही आपली मिळकत मटका जुगार खेळण्यात गमावू लागले आहे. त्यामुळे त्यांचे उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले असून त्यांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहेत. पुरुषांबरोबरच महिलाही मटक्याचे आकडे लावतांना दिसत आहे. मटक्याच्या नादात झटपट पैसा मिळवण्याच्या लालसेपायी सगळं काही गमावून बसण्याची वेळ अनेकांवर आली आहे. अनेकांचे संसार या मटक्याने उध्वस्त केले आहेत. मटक्याच्या आकड्यांवर नशीब आजमावण्याची सवय नागरिकांना बर्बादीच्या मार्गावर नेऊ लागली आहे. त्यामुळे राजरोसपणे सुरु असलेल्या राजूर (कॉ.) येथील मटका अड्ड्यांवर कार्यवाही करून ते कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी येथील रहिवाशांमधून होऊ लागली आहे.
Comments
Post a Comment