भारतमाता चौक ते गणेशपूर घाट काँक्रेट रस्त्याच्या बांधकामात अनियमितता, धीरज पाते यांनी केली तक्रार



प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील भारतमाता चौक ते गणेशपूर घाट काँक्रेट रस्त्याचे अर्धवट बांधकाम करण्यात आल्याने या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून शिवनेरी चौकातील चौफुलीवर मागील तीन ते चार महिन्यापासून काँक्रेट अप्रौचबाबत कंत्राटदाराला सांगूनही तो याकडे दुर्लक्ष करीत असल्याची लेखी तक्रार माजी नगर सेवक धीरज पाते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. रोडच्या बाजूला असलेली नालीही सताड खुली असून नालीवर चेंबर देखील बसविण्यात आले नसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. .

शहरात रस्ते विकासाकरिता आलेल्या निधीतून काँक्रेट रस्त्यांचे बांधकाम केले जात असले तरी रस्ते बांधकामात अनियमितता आढळून येत आहे. सिमेंट रस्त्यांचे बांधकाम करतांना त्याची गुणवत्ता तपासली जात नसल्याने निकृष्ठ दर्जाचे रस्ते तयार होतांना दिसत आहे. काही ठिकाणी तर रस्त्यांचे अर्धवट बांधकाम करण्यात आल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. भारतमाता चौक ते गणेशपूर घाट पर्यंतच्या काँक्रेट रस्त्याचे अर्धवट बांधकाम करण्यात आल्याची तक्रार स्वतः माजी नगर सेवकाने केली आहे. रस्त्याची विकासकामे हाती घेण्यात आली असली तरी रस्त्याच्या बांधकामावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने या विकासकामांचाच आता नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. कंत्राटदार जाबदारीने कामे करीत नसल्याच्या तक्रारी नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. सदर रस्त्याचे अर्धवट बांधकाम करण्यात आल्याने या रस्त्यावर अपघात होऊ लागले आहेत. शिवनेरी चौकातील चौफुलीवर मागील तीन ते चार महिन्यांपासून काँक्रेट अप्रौचबाबत सांगूनही कंत्राटदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. रोडच्या बाजूला असलेली नाली सताड खुली असून नालीवर चेंबर देखील बसविण्यात आले नसल्याचे धीरज पाते यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

कंत्राटदार रस्ते बांधकामाचे कंत्राट तर घेतात, पण घेतलेल्या कंत्राटानुसार रोडचे बांधकाम पूर्ण न करता जेथे अधिक लाभ मिळतो, त्या रस्त्याचे बांधकाम करण्यावर जास्त भर देतात. रस्त्याचे अर्धवट बांधकाम केले जात असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याने मार्गक्रमण करतांना दुचाकीस्वारांना नेहमी अपघाताला सामोरे जावे लागते. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी माजी नगर सेवक धीरज पाते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या तक्रार अर्जातून केली आहे. या तक्रारीच्या प्रतिलिपी त्यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, न.प. प्रशासकीय अधिकारी, न.प. मुख्याधिकारी, न.प. बांधकाम अभियंता यांना देखील दिल्या आहेत.


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी