प्रशांत चंदनखेडे वणी
विवाहित महिलेचे शारीरिक शोषण केल्याच्या आरोपाखाली एका तरुणाला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मुलीची आई असलेल्या महिलेला तरुणाने भूलथापा देऊन प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. तिच्याशी जवळीक साधत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. तीन दिवसांनी ते दोघेही गावात परत आले. त्यांनी लग्न करून सोबत राहण्याचा निर्णय देखील घेतला. पण अचानक तरुणाने घेतलेला निर्णय फिरविला. त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. शेवटी महिलेने तरुणाविरुद्ध शारीरिक शोषणाची तक्रार नोंदविली. महिलेच्या तक्रारी वरून पोलिसांनी तरुणाला अटक केली असून त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज सुनिल पावडे (२७) रा. वाघदरा असे या शारीरिक शोषणाच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अविवाहित तरुणाने विवाहित महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला भूलथापा देऊन तिच्याशी जवळीक साधली. एकमेकांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांच्यातील सहवास वाढला. दीर्घ सहवासामुळे त्यांच्यात आकर्षणातून प्रेमसंबंध व प्रेमसंबंधातून शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. तो तिला लाग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण करीत होता. तिला प्रलोभनं व आमिषं देऊन त्याने तिचं सतत शारीरिक शोषण केलं. नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्याची तयारी दर्शवून तिला पळवून नेले. तीन दिवस बेपत्ता राहिल्यानंतर ते गावी परतले. दोघांनीही लग्न करून सोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण अचानक तरुणाने शब्द फिरविला. त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. विवाहित असतांनाही अविवाहित तरुणावर भाळलेल्या महिलेने शेवटी तरुणाविरुद्ध शारीरिक शोषणाची तक्रार दाखल नोंदविली. महिलेच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी सुरज पावडे याला अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अजित मार्गदर्शनात सपोनि आशिष झिमटे करीत आहे.पत्नी घर सोडून तरुणासोबत पळून गेली असतांनाही पती तिचं सांत्वन करीत होता. तिला पत्नी म्हणून स्वीकारायलाही तयार होता. पण ती नवऱ्यासोबत नाही तर त्या तरुणासोबत घरठाव करण्याची जिद्द करीत होती. पदरात एक ते दीड वर्षाची चिमुकली असतांनाही तिचं पोटच्या गोळ्याकडेही दुर्लक्ष झालेलं. नवरा तिच्या मागं मागं फिरत होता. तेंव्हा निरागस कोण हा प्रश्न सर्वांना पडला होता. नवरा साधाभोळा, एवढं सगळं घडूनही तिची समजूत काढत होता. पण ती त्या तरुणासोबत लग्न करण्याच्या जिद्दीनं पेटली होती. शेवटी त्या तरुणानं लग्न करण्यास नकार दिला. पण नवरा मात्र खंबीर होता. पत्नी म्हणून त्याही परिस्थितीत तिला स्वीकारलं. आणि तिला आधार देत घरी घेऊन गेला. लग्न झालं संसार थाटला पण नाद सुटला नाही. नवरा, मुलं व संसाराची जाणीव न ठेवता कुणाच्याही आकर्षणाला बळी पडून संसाराचं वाटोळं करणाऱ्या महिला व पुरुषांमुळे कित्येक संसार उध्वस्त झाले आहेत. व्यभिचारी प्रवृत्तीमुळे नैतिकता लोप पावत चालली आहे. बेधुंद मनाच्या लहरी प्रमाणे भावना उसळ्या मारू लागल्या आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं झालं आहे.
No comments: