Latest News

Latest News
Loading...

काय म्हणावं.. घरासमोर उभी असलेली दुचाकीही जाऊ लागली चोरीला, दुचाकी चोरट्यांच्या वाढल्या हिंमती

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहर व तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. घरासमोर उभी असलेली दुचाकीही चोरीला जाऊ लागल्याने नागरिकांना आता आपल्या किंमती वस्तूंच्या सुरक्षेची काळजी वाटू लागली आहे. शहर व तालुक्यात दुचाकी चोरटे मोठ्या प्रमाणात सक्रिय असून त्यांनी दुचाकी चोरींची धूम माजवली आहे. घरासमोर उभ्या असलेल्या दुचाक्याही हे चोरटे लंपास करू लागले आहेत. त्याचप्रमाणे शेतात काम करतांना शेतशिवारात उभ्या केलेल्या दुचाक्यांचीही हे चोरटे चोरी करू लागले आहेत. त्यामुळे या दुचाकी चोरट्यांची शहर व तालुक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली असून या दुचाकी चोरटयांनी नागरिकांमध्ये धडकी भरविली आहे. दुचाकी चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यात किंवा या दुचाकी चोरट्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. 

शहरातील जैन ले-आऊट येथे राहणाऱ्या शत्रुघन सुखराम वर्मा यांची महागडी (व्हुम कंपनीची) दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. घरासमोर उभी असलेली दुचाकी (MH २९ BY ८२३०) चोरट्यांनी चोरून नेल्याने शत्रुघन वर्मा हे चांगलेच काळजीत आले आहेत. ६ जुलैला रात्री १२ ते ४ या दरम्यान चोरट्यांनी दुचाकी चोरीचा डाव साधला. घरासमोरून दुचाकी चोरीला जाऊ लागल्याने नागरिकांच्या किंमती वस्तूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधी कार्यालय, बँक व दुकानांसमोर पार्क केलेल्या दुचाक्या चोरीला जायच्या. आता तर घरापुढे उभ्या असलेल्या दुचाकी चोरी करण्याइतपत चोरट्यांची मजल जाऊ लागली आहे. दुचाकी मालकाने याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पोलिस दुचाकी चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

दुचाकी चोरीची दुसरी घटना उमरी (पेटूर) शेतशिवारात घडली. पुंडलिक बाळकृष्ण माथनकर (४२) रा. उमरी या कास्तकाराची शेतासमोरील रस्त्यावर उभी असलेली दुचाकी (MH २९ Q ५०४२) अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. पुंडलिक माथनकर हे शेतपिकांचा हंगाम असल्याने शेतात कामे करण्याकरिता गेले होते. त्यांनी आपली दुचाकी शेतासमोरील रोडवर उभी केली. शेतातील कामे आटपून ते जेंव्हा घरी जाण्याकरिता निघाले तेंव्हा त्यांना रोडवर उभी केलेली दुचाकी दिसली नाही. शेतासमोर उभी केलेली दुचाकी न दिसल्याने त्यांच्या उरात धडकीच भरली. त्यांनी आपल्या परीने दुचाकीचा शोध घेतल्यानंतर पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवली. ही घटना २ जुलैला दुपारी १ ते २.३० वाजताच्या दरम्यान घडली. दुचाकी चोरट्यांनी शहर व तालुक्यात धूम माजवली असून हे चोरटे घर व शेतासमोर उभ्या केलेल्या दुचाक्या चोरी करू लागल्याने नागरिक चांगलेच काळजीत आले आहेत. रात्री तर हे चोरटे दुचाकी चोरीचा डाव साधतच आहेत, पण भरदिवसाही शेतासमोर उभी असलेली दुचाकी चोरी करण्याइतपत त्यांची मजल वाढली आहे. दुचाकी चोरीच्या घटना थांबता थांबत नसल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. दुचाकी चोरींचे सुरु असलेले सत्र थांबविण्याकरिता पोलिसांकडून कोणतीही मोहीम राबविली जात नसल्याने चोरट्यांच्या हिंमती वाढल्या आहेत. पोलिसांना आता ऍक्टिव्ह मोडवर येण्याची गरज निर्माण झाली असून दुचाकी चोरट्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश करणं गरजेचं झालं आहे. 

No comments:

Powered by Blogger.