आलिशान इमारतीत सुरु असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांची धाड, ११ जुगाऱ्यांना अटक व ३ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील गंगा विहार येथील एका इमारतीत सुरु असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी धाड टाकून गंजी पत्त्यावर पैशाचा जुगार खेळणाऱ्या ११ आरोपींना अटक केली आहे. गंगा विहार येथील चिंतामणी अपार्टमेंट मागील एका दुमजली इमारतीच्या बंद खोलीत हे जुगारी गंजी पत्त्यावर पैशाचा जुगार खेळत असतांना पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून त्यांना रंगेहात अटक केली. ही कार्यवाही आज १५ जुलैला दुपारी ४.१० वाजताच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून ३ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल केला आहे.
गंगा विहार येथील चिंतामणी अपार्टमेंटच्या मागे असलेल्या दुमजली इमारतीतिल एका बंद खोलीत जुगार खेळला जात असल्याची विश्वसनीय माहिती ठाणेदार अजित जाधव यांना मिळाली. त्यांनी एपीआय ओमप्रकाश पेंडकर यांच्या नेतृत्वात पोलिस पथक तयार करून त्यांना माहिती मिळालेल्या ठिकाणी रवाना केले. एपीआय ओमप्रकाश पेंडकर यांनी त्या ठिकाणी सापळा रचून कुणाला सुगावा न लागू देता मोठ्या शिताफीने गंगा विहार येथिल जुगार अड्यावर धाड टाकली. पोलिसांना एका बंद खोलीत ११ जुगारी गंजी पत्यावर पैशाची हारजीत खेळतांना रंगेहात सापडून आले. पोलिसांनी अकराही जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर मजुका च्या कलम ४, ५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जुगार खेळतांना अटक केलेल्या आरोपींमध्ये महेंद्र तुळशीराम तामगाडगे (६०) रा. मेघदूत कॉलनी, केशव मोतीराम पडोळे (७०) रा. वसंत गंगा विहार, महादेव डोमाजी खिरटकर (५१) कणकवाडी, सिद्धार्थ उत्तम मुन (४०) रा. राजू गांधी चौक, चेतन आनंदराव आगलावे (३९) रा. रविनगर, महेश रामदास कामडे (३३) रा. मोक्षधाम जवळ, शास्त्रीनगर, अब्दुल अन्सार अब्दुल फैजान (३५) रा. काळे ले-आऊट, नितीन शामराव नागपुरे (३५) रा. मोहर्ली, सौरभ सुनिल उलमाले (३१) रा. पद्मावती नगर, प्रशिल विनोद नाखले (२४) रा. शास्त्रीनगर, सुभाष आनंदराव चिडे (४९) रा. चिखलगाव यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्या जवळून ९ हजार २० रुपये रोख, ७ दुचाक्या किंमत ३ लाख २० हजार रुपये व ५२ गंजी पत्ते असा एकूण ३ लाख २९ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही मागील काही दिवसांतील जुगारावरची मोठी कार्यवाही मनाली जात आहे. आलिशान इमारतीत सुरु असलेल्या जुगार अड्याचा पोलिसांनी पर्दाफाश करीत ११ जुगाऱ्यांना अटक केली. या धडक कार्यवाहीने जुगार अड्डे चालविणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, एपीआय ओमप्रकाश पेंडकर, वसीम शेख, पोकॉ. डडमल, सागर सिडाम, शंकर चौधरी, सुनील व पोलिस पथकाने केली.



No comments: