Latest News

Latest News
Loading...

स्वच्छतेचे धडे देणाऱ्या नगर पालिकेचेच शहरात स्वच्छता ठेवण्याकडे होऊ लागले दुर्लक्ष



प्रशांत चंदनखेडे वणी 

नगर पालिकेचे शहरातील साफसफाई व स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतेचे धडे देणारी नगर पालिकाच शहर स्वच्छ ठेवण्यात असमर्थ ठरू लागली आहे. शहरातील बहुतांश प्रभाग व वस्त्यांमध्ये अस्वच्छता निर्माण झाली आहे. रस्त्यांच्या आजूबाजूला घाण कचरा जमा झाला असतांनाही त्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यांनी जाणे येणे करतांना नाकावर रुमाल ठेवण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. मागील अनेक दिवसांपासून नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तर तुंबल्याच आहेत. पण नाल्यांचे पाणी वाहून नेणारी गटारेही तुंबल्याने नाल्यांचे पाणी रस्त्यांवरून वाहतांना दिसत आहे. डुकरांनी तर शहरासह रहिवासी वस्त्यांमध्ये हौदोस घातला आहे. डुकरांचे कळप नागरिकांच्या अंगण व आवारात संचार करतांनाच त्यांच्या घरात देखील शिरतांना दिसत आहे. ही डुकरे घाण पसरविण्यात मुख्य भूमिका बजावत आहे. सांडपाणी फेकण्याकरिता घराबाहेर पडणाऱ्या महिलांनी तर या डुकरांची चांगलीच धास्ती घेतली आहे. सांडपाण्याचं पातेलं महिलांच्या हातात दिसलं की, हि डुकरे त्यांच्या मागे धावतात. त्यामुळे महिलांची चांगलीच तारांबळ उडतांना दिसते. घाण कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाड्यांचेही वेळापत्रक कोलमडल्याने नागरिक खुल्या जागेत कचरा टाकतांना दिसत आहेत. शहरात जिकडे तिकडे अस्वच्छता निर्मण झालेली असतांना नगर पालिका प्रशासनाने मात्र आंधळेपणाचं सोंग घेतलं आहे.

शहरातील काही प्रभागातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची मागील अनेक दिवसांपासून साफसफाईच झाली नसल्याची ओरड रहिवाशांमधून ऐकायला मिळत आहे. नाल्यांची साफसफाई करण्यात न आल्याने नाल्या ठिकठिकाणी तुंबल्या आहेत. एवढेच नाही तर गटारांचीही साफसफाई करण्यात न आल्याने ते देखील तुंबले आहेत. त्यामुळे नाल्यांचे पाणी रस्त्यांवरून वाहतांना दिसत आहे. नाली व गटारांच्या साफसफाई अभावी परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून घाणीमुळे दुर्गंधी पसरली आहे. घाण व दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांना संसर्गजन्य आजारांची लागण होतांना दिसत आहे. घाणीमुळे डासांचाही प्रादुर्भाव वाढला असून मुलांना मलेरिया व डेंग्यू सारख्या आजारांची लागण होतांना दिसत आहे. 

गौरकार कॉलनी येथील दोन मुलांना डेंग्यूची लागण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नगर पालिकेचं स्वच्छतेकडे पूर्णतः दुर्लक्ष होऊ लागलं आहे. घाण कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांचेही वेळापत्रक कोलमडल्याने नागरिक खुल्या जागेवरच कचरा टाकतांना दिसतात. त्यामुळे परिसरात व रस्त्याच्या आजूबाजूला कचरा जमा झालेला दिसून येतो. डुकरांनीही रहिवासी वस्त्यांमध्ये हौदोस घातला आहे. घाणीने भरलेली डुकरे नागरिकांच्या अंगणातून संचार करतांना दिसतात. एवढेच नाही तर नागरिकांच्या घरातही ही डुकरे शिरू लागली आहेत. त्यामुळे नागरिकांमधून चांगलाच संताप व्यक्त होतांना दिसत आहे. स्वच्छतेचे धडे देणाऱ्या नगर पालिकेने दिव्याखालचा अंधार दूर करून शहर स्वच्छ ठेवण्याची जबादारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असा सूर शहरातून उमटू लागला आहे. 

No comments:

Powered by Blogger.