लोकसंदेश वृत्त
लिखान हे दुधारी तालवारीसारखं झालं आहे. लिखानाचा उद्देश कुणाला तरी टार्गेट करणे हा झाला आहे. शब्द जुळवितांना ज्यांच्या वाक्याचे सार बदलतात ते दुसऱ्याच्या लिखानातून आपली पोळी भाजून घेत आहेत. कर्तव्यनिष्ठतेवर कलंक लावणारे लिखान करून पोलिसांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा विडाच काहींनी उचलल्याचे दिसत आहे. लिखानातून नाहक कुणाचीतरी बदनामी करून त्यांना अपमानित करण्याचं काम काहींनी हाती घेतलं आहे. संबंधितांची पाठराखण करण्याकरिता पोलिसांनाच टार्गेट केलं जात आहे. पोलिसांवर वसुलीबाजीचे आरोप करून त्यांच्या कार्यवाहीची धार बोथट करण्याचे प्रयत्न केले जात आहे. अवैध धंद्यांवर कार्यवाही केल्यास पोलिसांनाच टार्गेट केले जात असल्याची खंत एका पोलिस शिपायाने व्यक्त केली आहे.
पोलिसांना त्यांच्याच ब्रीद वाक्याची आठवण करून दिली जाते, पण लिखानाच्या आडून पाठीराख्याची भूमिका निभावली जाते त्याच काय, हा प्रश्नही त्या पोलिस शिपायाने उपस्थित केला आहे. खाकी वर्दीचा धाक दाखवून वसुली केली जात असल्याचा आळ घेणाऱ्यांनी आधी लेखणीच्या माध्यमातून पाठीराख्याची भूमिका घेणे बंद करावे. आम्ही पोलिस म्हणून सज्जनांचे रक्षण तर करतोच पण एखाद्या गुन्हेगाराचा जीव धोक्यात आल्यास त्याच्याही मदतीला धावून जातो. पण त्यांच्या लिखानाच्या कवच कुंडलातून कुणाचा विजय साकारला जातो, हे न सांगितलेलच बरं, ही प्रतिक्रिया देखील त्या पोलिस शिपायाने व्यक्त केली आहे. कुणाच्या जीवावर कोण उड्या मारतो, हे सुज्ञ जनतेला चांगलंच ठाऊक आहे. एखाद्याच्या प्रामाणिकतेला कलंक लावणाऱ्या लिखानकाराने आधी आपण कुणाचे हित साधण्यासाठी लिखानकार झालो, हे तपासून पहावे. एखाद्या कर्तव्यनिष्ठ पोलिसावर वसुलीचा आरोप करणाऱ्यांनी आपलं लिखान प्रामाणिक ठेवावं, अशी संवेदनशील प्रतिक्रिया त्या पोलिस शिपायाने व्यक्त केली आहे.

No comments: