प्रशांत चंदनखेडे वणी
वेकोलिच्या अधिनस्त असलेल्या हाय प्राईड ॲम्बुलन्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार आधारभूत व नियमित वेतन दिल्या जात नसल्याची लेखी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका शाखेच्या वतीने वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक यांच्याकडे करण्यात आली आहे. या कंपनीतील कर्मचाऱ्यांना आधारभूत व नियमित वेतन न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेच्या तालुका शाखेने दिला आहे.
वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रात रुग्णसेवेकरीता कार्यरत हाय प्राईड ॲम्बुलन्स प्रा.लि. या कंपनीत रुग्णवाहिकेवर कर्तव्य बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या जीआर नुसार व नियमित वेतन मिळत नसल्याचे मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या कानावर पडताच त्यांनी वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक यांची भेट घेऊन त्यांना वेकोलिच्या अधिनस्त असलेली हाय प्राईड ॲम्बुलन्स प्रा.लि. ही कंपनी कर्मचाऱ्यांचे शोषण करीत असल्याचे सांगितले. या कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या जीआर नुसार व नियमित वेतन मिळत नसल्याची लेखी तक्रारही त्यांनी मुख्य महाप्रबंधक यांच्या कडे केली. रुग्णवाहिकेवर कर्तव्य बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांना आधारभूत व नियमित वेतन न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी तक्रार अर्जातून दिला आहे.
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, मनसेचे शिवराज पेचे, हितेश वैद्य, सुरज काकडे, राजू चिंचोलकर, प्रकाश वानखेडे, रितिक मामीडवार, गजानन तोडसाम, गोलू सातपुते, राकेश वराडकर, पंकज मडावी, अनिल पिदूरकर उपस्थित होते.

No comments: