Latest News

Latest News
Loading...

तालुक्यात आत्महत्यांचं सत्र सुरूच, आज आणखी एका इसमाने घेतला गळफास

प्रशांत चंदनखेडे वणी 

नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या एका इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ७ ऑगष्टला सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गणपत जयराम वांढरे (५५) रा. नांदेपेरा असे या गळफास घेतलेल्या इसमाचे नाव आहे. घराच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो कुटुंबियांना आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रूग्णालयात पाठविला. तालुक्यात सतत होत असलेल्या आत्महत्यांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.  

नांदेपेरा येथे कुटुंबासह रहात असलेला गणपत हा मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदर्निवाह करायचा. मृतक गणपत याचे दोन भाऊ आधीच मरण पावले तर मोठा भाऊ गावातच कुटुंबासह राहतो. त्यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. गणपत हा मजुरी करून आपल्या संसाराचा गाडा हाकायचा. मागील काही दिवसांपासून तो घरीच होता. अशातच त्याने नैराशेतून गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. त्याच्या पश्चात दोन मुले व पत्नी असा आप्त परिवार आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहे.    

No comments:

Powered by Blogger.