Latest News

Latest News
Loading...

वागधरा ग्रामपंचायतेचा अजब कारभार, ग्रामपंचायत हद्दीतील मुरूम खाजगी कामांना तर गावातील कामांकरिता बाहेरून बोलावला जातो मुरूम

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी पंचायत समिती अंतर्गत येणारी वागधरा ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी व गाव सेवकाच्या कारभारामुळे सतत चर्चेत असते. मनरेगा अंतर्गत करण्यात आलेली विकासकामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असल्याची गावातून ओरड सुरु असतांनाच ग्रामपंचायतीने मुरूम व मलब्याची परस्पर विल्हेवाट लावल्याची चर्चा आता गावात रंगू लागली आहे. गावात मोठ्या प्रमाणात भूमिगत नाल्यांची कामे करण्यात आली. नाल्यांचे खोदकाम करतांना निघालेला मुरूम आपसी संगमताने एमआयडीसी येथे पाठविण्यात आल्याची जोरदार चर्चा गावात सुरु आहे. तसेच ग्रामपंचायतेच्या आवारात साठवून असलेला मलबाही खाजगी ले-आऊटवर टाकण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. ग्रामपंचायतेने नाल्यांच्या खोदकामातून निघालेला मुरूम व साठवून ठेवलेला मलबा नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांलगत भरणे गरजेचे असतांना ग्रामपंचायतेने तो खाजगी कामांकरिता पुरविला. आणि आता बाहेरून मुरूम आणून गावातील कामे केली जात असल्याने ग्रामपंचायतीच्या उलट कारभाराची नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

वागधरा ग्रामपंचातीला मनरेगा अंतर्गत मिळालेल्या निधीतून गावात सिमेंट रस्ते व नाल्यांची कामे करण्यात आली. मनरेगा अंतर्गत गावात करण्यात आलेली कामे अत्यंत निकृष्ट झाल्याची गावकऱ्यांमधून ओरड सुरु आहे. मनरेगाच्या कामांमध्ये गावकऱ्यांना रोजगार न मिळल्याचेही ऐकायला मिळत आहे. जेसीबी मशीनच्या माध्यमातून नाल्यांचे खोदकाम करण्यात आले. अनावश्यक ठिकाणी नाल्या बांधून निधीची उधळण करण्यात आली. नाल्या बांधतांना काँक्रेट व सळाखी अतिशय कमी वापरण्यात आल्या. नालीवर टाकण्यात आलेला धापा एका छोट्या मालवाहू वाहनाच्या जाण्याने फुटला, व वाहनाचे चाक नालीत फसले. चालकाने समयसूचकता दाखविली नसती तर वाहन उलटले असते. नालीच्या बांधकामाला एक महिनाही पूर्ण झाला नसतांना नालीची ही अवस्था झाली. त्यामुळे नाल्यांची कामे अतिशय दर्जाहीन झाल्याची खुली चर्चा गावकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे. 

नाल्यांचे खोदकाम करतांना मोठ्या प्रमाणात निघालेला मुरूम खाजगी कामांना पुरविण्यात आला. आपसी संगमताने मुरुमाची विल्हेवाट लावण्यात आली. खोदकामातून निघालेला हा मुरूम एमआयडीसी परिसरात पाठविण्यात आल्याची जोरदार चर्चा गावात सुरु आहे. खोदकामातून निघालेल्या या मुरुमाची नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यालगत भराई करणे गरजेचे असतांना हा मुरूम खाजगी कामांवर ओतण्यात आला. यातून कुणाचे हित साधण्यात आले, हा चर्चा विषय बनला आहे. लोकप्रतिनिधी व गाव सेवकाकडून मनमर्जी कामे केली जात असल्याचे उघड होऊ लागले आहे. आपसी संगमताने मुरुमाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. ग्रामपंचायतेच्या आवारात साठवून ठेवलेला मलबाही खाजगी ले-आऊटवर टाकण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. यावरून ग्रामपंचायतेची विश्वासाहर्ता लक्षात येते. ग्रामपंचायतेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आपले हित साधत असून यापूर्वीही अशाप्रकारची कामे झाली असावी, ही शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रामपंचायतेने खोदकामातून निघालेला मुरूम व साठवून असलेला मलबा खाजगी कामांना पुरविला. आणि आता बाहेरून मुरूम बोलावून गावातील कामे केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकप्रकारे ग्रामपंचायत निधीची उधळण करीत असल्याची चर्चा गावात रंगली आहे. 

No comments:

Powered by Blogger.