Latest News

Latest News
Loading...

कास्तकाराने विषारी द्रव्य प्राशन करून केली आत्महत्या

प्रशांत चंदनखेडे वणी 

तालुक्यातील कुंभारखनी येथील एका अल्पभूधारक कास्तकाराने नैराशेतून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९.२० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विजय शंकर गौरकार (४०) असे या मृत्यूला कवटाळलेल्या कास्तकाराचे नाव आहे. 

विजय गौरकार यांच्याकडे १.५ एकर शेती आहे. ते या शेतीच्या उत्पनातून आपला व आपल्या परिवाराचा उदर्निवाह करायचे. कुंभारखनी येथे परिवारासह ते वास्तव्यास होते. आज ९ ऑगष्टला सकाळी ८ वाजता अचानक त्यांनी राहत्या घरीच विषारी द्रव्य प्राशन केले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात विजय गौरकार यांच्यावर उपचार सुरु असतांनाच आज ९.२० वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलल्या जात असले तरी त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहे. विजय गौरकार यांच्या पश्चात पत्नी एका मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. विजय गौरकार या कास्तकाराने असा हा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.   

No comments:

Powered by Blogger.