प्रशांत चंदनखेडे वणी
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात लोकशाही मार्गाचा अवलंब करण्यात आला. लोकांचं राज्य निर्माण झालं. जन मतावर सरकार स्थापन होऊ लागलं. लोकांच्या हातात देशाची सूत्रे आली. सर्वांना सामान न्याय अधिकार मिळाले. आपल्या हक्कांसाठी लढण्याचं बळ देशवासियांना मिळालं. स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या तत्वावर देशाचं जडण घडण सुरु झालं. सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश म्हणून साऱ्या जगतात भारताची शान वाढली. देशात सर्व जाती, धर्म, पंथाची लोकं गुण्या गोविंदानं नांदू लागली. प्रथा, परंपरा व विविधतेनं नटलेला हा देश आहे. या देशात बंधुभावाची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहे. हा बंधुभाव असाच अबाधित ठेऊया. चला सर्व मिळून स्वातंत्र्य दिन साजरा करूया !
सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छुक :- जयप्रकाश मेश्राम, ग्रामसचिव निंबाळा

No comments: