Latest News

Latest News
Loading...

४१ फूट उंच दहीहंडीचा थरार आणि प्राजक्ता माळीही येणार, मनसे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून साकारला हा अविष्कार

प्रशांत चंदनखेडे वणी 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून भव्य असा हा दहीहंडी उत्सव प्रथमच विदर्भात साकार होत आहे. वणी उपविभागासाठी ही आनंदाची पर्वणी असून जमिनी पासून ४१ फुट उंच असणाऱ्या दहीहंडीचा थरार उपविभागातील जनतेला अनुभवायला मिळणार आहे. या दहीहंडी उत्वाची मनसे कडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील शासकीय मैदान (पाण्याची टांकी) या भव्य पटांगणावर ११ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता पासून दहीहंडीचा हा थरार पहायला मिळणार आहे. सोबतच सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी ही देखील या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविणार आहे. मोठमोठ्या महानगरांमधून गोविंदा पथक या दहीहंडी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आता पर्यंत १५ गोविंदा पथकांनी या स्पर्धेकरिता नाव नोंदणी केली आहे. रेकॉर्ड ब्रेक थरांसाठी आकर्षक बक्षीसही ठेण्यात आली आहे. प्रथम बक्षीस २ लाख ५० हजार, द्वितीय १ लाख तर तृतीय बक्षिस ५० हजार रुपये ठेवण्यात आले आहे. दहीहंडी स्पर्धेकरिता एवढी मोठी रक्कम बक्षीस म्हणून ठेवण्याची विदर्भातील ही पहिलीच वेळ आहे. राजू उंबरकर यांनी अलीकडच्या काळात सामाजिक, धार्मिक व महापुरुषांचे जयंती उत्सव भव्य स्वरूपात साजरे केले आहेत. त्यामुळे दहीहंडी उत्सवालाही त्यांनी भव्य स्वरूप दिले आहे. मनसेचा बाणा हा ताठ कणा असल्याने कोणत्याही उत्सवात शहरवासीयांची मान ताठ ठेवण्याचा राजू उंबरकर यांनी नेहमी प्रयत्न केला आहे. 

सर्वधर्म समभावना ठेऊन मनसेने सामाजिक, धार्मिक व महामुरुषांचे जयंती उत्सव जल्लोषात साजरे केले. शिवाजी महाराजांची जयंतीही त्यांनी आकर्षक देखदेखाव्यासह भव्य स्वरूपात साजरी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवातही तरुणांमध्ये जोश भरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुस्लिम बांधवांच्या कार्यक्रमांमध्येही ते हिरीरीने सहभाग घेतात. प्रत्येकच उत्सवाला त्यांनी उत्साहाची झालर दिली. सन, उत्सव, सामाजिक, धार्मिक सोहळे त्यांनी जनतेत सहभागी होऊन साजरे केले. यापुढे आणखीच उत्साहात व जोशात सर्व धर्मांचे सोहळे व महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्याचा मानस त्यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा दहीहंडी उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येत आहे. वणी तालुक्यातील जनतेने नेहमी एकोप्याचं दर्शन घडवलं आहे. येथे सर्व धर्माचे लोकं गुण्यागोविंदाने नांदतात. तालुक्यातील जनतेने बंधुभावाची संस्कृती जपली आहे. हाच वारसा राजू उंबरकर हे पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. 

राजू उंबरकर यांनी वणी उपविभागात नेहमी सामाजिक, धार्मिक व सेवाभावी उपक्रम राबविले आहे. यापुढे याही पेक्षा मोठे सामाजिक उपक्रम राबविण्याची त्यांची संकल्पना आहे. अनेक महत्वकांक्षी योजना ते राबविणार आहेत. जनहिताचे विविध उपक्रम त्यांच्या संकल्पनेतून साकार होणार आहेत. हे उपक्रम लवकरच जनतेपुढे येणार असून या उपक्रमांचा जनतेला मोठा लाभ होणार आहे. वणी उपविभागातील जनतेच्या सर्व समस्या व प्रश्न मार्गी लावण्याचं धोरण राजू उंबरकर यांनी आखलं आहे. सर्वसामान्यांचं जगणं सुकर करण्याचा त्यांचा संकल्प असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. धार्मिक परंपरा जोपासताना त्यांनी धार्मिक उत्सवातून आनंद साजरा करता यावा, म्हणून धार्मिक व सामाजिक सोहळे भव्य स्वरूपात साजरा करण्याचा विडा उचलला आहे. दहीहंडी उत्सवाला भव्य स्वरूप देऊन जनतेचा उत्साह व तरुणाईचा आनंद द्विगुणित करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. मुंबई नंतर महाराष्ट्रात वणी येथे ४१ फूट उंच दही हंडी साकारण्याची किमया राजू उंबरकर यांनी केली आहे. ४१ फूट उंच दहीहंडीचा थरार उपविभागातील जनतेला अनुभवायला मिळणार आहे. मानवी मनोरे तयार करून गोविंदा पथक ही दहीहंडी फोडणार आहे. या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी वणी उपविभागातील जनतेला लाभणार आहे. सोबत सिनेतारका प्राजक्ता माळीही राहणार आहे. प्राजक्ता माळी आणि ४१ फूट उंच दहीहंडी हा क्षण डोळ्यात साठवून ठेण्यासारखा राहणार असून या दहीहंडी सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याकरिता जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविण्याचे आव्हान पक्ष नेते राजू उंबरकर यांनी केले आहे. 

No comments:

Powered by Blogger.