Latest News

Latest News
Loading...

अखेर..सराईत गुन्हेगार राजू पोटे अडकला पोलिसांच्या जाळ्यात, चार महिन्यांपासून पोलिसांना देत होता गुंगारा

प्रशांत चंदनखेडे वणी 

मागील चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला अट्टल चोरटा अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. अनेक गंभीर गुन्हांमध्ये आरोपी असलेला हा गुन्हेगार वेळोवेळी पोलिसांना हुलकावणी देत होता. घरफोडी व चोरींच्या घटनांचा मुख्य सूत्रधार व अनेक गंभीर गुन्हांमध्ये प्रमुख आरोपी असलेल्या राजू पुरुषोत्तम पोटे (४७) रा. नवीन लालगुडा या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. पोलिस रेकॉर्डवर वॉन्टेड असलेला राजू पोटे हा अट्टल चोरटा मागील चार महिन्यांपासून पोलिसांना चकमा देत होता. पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. पोलिस राजू पोटे याचा मागोवा घेत असतांना तो वाघदरा येथिल नदी किनाऱ्यालगत लपून असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. गुन्हे शोध पथक तात्काळ त्याठिकाणी पोहचले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी तेथून पसार होण्याच्या तयारीत असतांनाच पोलिसांनी त्याचा पाठलाग करून शासकीय आयटीआय जवळ त्याला पकडले. चार महिन्यांपासून चकमा देत पोलिसांशी लपंडाव खेळत असलेल्या राजू पोटे या आरोपीला मोठया शिताफीने पोलिसांनी अटक केली.  त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. 

राजू पोटे हा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असून तो घरफोडी व चोरीच्या घटनांचा मुख्य सूत्रधार आहे. पोलिसांसाठी मोस्ट वाँटेड असलेला राजू पोटे हा दरवेळी पोलिसांना हुलकावणी देत होता. पोलिस त्याला पकडायला गेले की तो नागमोडी वळणाने सुसाट पळत सुटायचा. काही दिवसांपूर्वी पोलिसांशी त्याचा सामनाही झाला होता. त्यावेळी तो पोलिसांच्या हाती लागलाच असता पण पोलिसांची नजर चुकवून तो अलगद पळाला. मात्र यावेळी पोलिसांनी त्याला जाळ्यात अडकविण्याची पूर्ण तयारी केली होती. त्यामुळे यावेळी त्याची चलाखी पुलिसांपुढे चालली नाही. १९ मे ला दाखल तक्रारी वरून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध ३९९ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तेंव्हा पासून पोलिस राजू पोटे या सराईत गुन्हेगाराचा कसून शोध घेत होते. अखेर पोलिसांनी त्याला हुडकून काढत त्याच्या मुसक्या आवळल्या आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. 

सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, एपीआय माधव शिंदे, सपोनि सुदाम आसोरे, जमादार विकास धडसे, पोकॉ. शुभम सोनुले, सागर सिडाम, सुनिल नलगंटीवार, मोनेश्वर खंडरे यांनी केली.   

No comments:

Powered by Blogger.