प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील भांदेवाडा येथील वेकोलिच्या कोळसाखान परिसरातील सार्वजनिक खुल्या जागेवर जुगार खेळणाऱ्या सात जुगाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळून गंजी पत्ते व रोख रक्कम असा एकूण ५४ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही आज ९ सप्टेंबरला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
भांदेवाडा येथील वेकोलिच्या कोळसाखान परिसरातील सार्वजनिक खुल्या जागेवर असलेल्या टिनाच्या शेडमध्ये गंजी पत्त्यावर पैशाचा जुगार खेळला जात असल्याची विश्वसनीय माहिती ठाणेदार अजित जाधव यांना मिळाली. त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला त्याठिकाणी पाठविले. गुन्हे शोध पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे काही इसम पत्त्याचा जुगार खेळतांना आढळून आले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने सातही जुगाऱ्यांना अटक केली. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये राहुल नानाजी गोरे (२९), नामदेव अर्जुन आत्राम (५४), मिलिंद वसंता डंभारे (४५), सूर्यभान रमेश देवाळकर (२६), शंकर यादव खापणे (४५), चंद्रभान रमेश देवाळकर (३०) सर्व रा. भांदेवाडा यांचा समावेश असून या सातही जुगाऱ्यांवर पोलिसांनी मजुका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी गंजी पत्ते व रोख रक्कम असा एकूण ५४ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी मटका जुगारावर धाडसत्र अवलंबलं असून शहरातील व शहरालगत असलेल्या गावांमध्ये सुरु असलेल्या मटका जुगारावर धडक कार्यवाही करण्यात येत आहे. परंतु शहरापासून ७ किमी अंतरावर असलेल्या गावामध्ये सुरु असलेल्या मटका अड्ड्यांवर कार्यवाहीचा मुहूर्त निघेल काय, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अजित जाधव यांच्या आदेशावरून सपोनि माधव शिंदे, सफौ. सुदर्शन वानोळे, पोना हरिन्द्रकुमार भारती, पंकज उंबरकर, पोकॉ. विशाल गेडाम, गजानन कुडमेथे यांनी केली.


No comments: