Latest News

Latest News
Loading...

सामाजिक कार्याचा वारसा जपत विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त राबविले जात आहे विविध सामाजिक उपक्रम

प्रशांत चंदनखेडे वणी 

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, सामाज कार्यात अग्रेसर असलेले सामाजिक पुढारी तथा प्रतिष्ठित व्यापारी विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम व भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती वणीच्या सौजन्याने या सर्व कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ३१ ऑगस्ट पासून सामाजिक उपक्रमांची रेलचेल सुरु असून आज २ सप्टेंबरला जैताई मंदिर येथे भव्य मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिराचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरात येणाऱ्या रुग्णांकरिता जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. मोती बिंदू शस्त्रक्रियेचा व औषधोपचाराचा पूर्ण खर्च विजय चोरडिया यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 

दानशूर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे व वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबविणारे विजय चोरडिया यांचा ४ सप्टेंबरला वाढदिवस साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. विजय चोरडिया यांनी नेहमीच सामाजिक उत्तरदायित्व जोपासलं आहे. त्यांनी सर्वसामान्यांना सर्वोतपरी मदतीचा हात दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची निगा राखण्याचा त्यांनी विडाच उचलला आहे. नागरिकांच्या काळजीपोटी त्यांनी वेळोवेळी आरोग्य शिबिरं घेऊन जनसेवेचं व्रत जोपासलं आहे. नागरिकांच्या अनेक गंभीर आजारांचा खर्च त्यांनी उचलला आहे. जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीच्या सौजन्यायने व त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावेळीही त्यांनी सामाजिक उपक्रमांचा वारसा जपला आहे. ३१ ऑगस्टला मारेगाव येथील सुविधा मंगल कार्यालय येथे व १ सप्टेंबरला कोळी समाज भवन कायर येथे धवल नेत्रालय नागपूर यांच्या सहकार्याने भव्य नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आलं. तर आज २ सप्टेंबरला जैताई मंदिर वणी येथे कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम यांच्या सहकार्याने हे भव्य शिबीर घेण्यात आलं आहे. या तीनही शिबिरांचा रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. उद्या ३ सप्टेंबरला अमृत भवन वणी येथे लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी प्रदर्शनी व आनंद मेळा देखील आयोजित करण्यात आला आहे. दुपारी २ वाजता पासून तर सायं. ६ वाजेपर्यंत लहान मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येतील, तर रात्री ९ वाजे पर्यंत प्रदर्शनी व आनंद मेळा राहणार आहे. 

सोमवारी ४ सप्टेंबरला प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचा सदाबहार भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत भजन संध्या अंतर्गत गाजलेली गायिका शहनाज अख्तर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे. त्यांची गाजलेली गाणी त्यांच्या सुमधुर आवाजातून प्रत्येक्षात प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविण्याचे आव्हान विजय चोरडिया यांनी केले आहे. जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती वणीच्या सौजन्यायने व सामाजिक पुढारी विजय चोरडिया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंत सतत सहा दिवस सामाजिक उपक्रम व भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यातील काही उपक्रम नागरिकांच्या भव्य प्रतिसादात पार पडले असून यानंतरच्या कार्यक्रमांनाही नागरिकांनी असाच प्रतिसाद देण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे. 

No comments:

Powered by Blogger.