लाइमस्टोन खदानीतील पाण्यात बुडालेल्या तरुणांचे आढळले मृतदेह, या व्ह्रदय हेलावणाऱ्या घटनेने शहरात पसरली शोककळा
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील वांजरी गावालगत असलेल्या लाइमस्टोन खाणीत साचलेल्या पाण्यात बुडालेल्या तीनही तरुणांचे मृतदेह शोध पथकाला सापडल्याने शक्यतेवर पूर्णविराम लागला आहे. शहरातील रहिवासी असलेले हे तीनही तरुण लाइमस्टोन खाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्याकरिता गेले असता त्यांचा पाण्यात बुडून करून अंत झाला. काल २ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास घडलेली ही दुर्दैवी घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्याठिकाणी एक मोपेड दुचाकी, कपडे व मोबाईल आढळून आल्याने या घटनेचा उलगडा झाला. आसीम अब्दुल सलाट शेख (१६), नुमान शेख सादिर शेख (१६) दोघेही रा. एकता नगर व प्रतीक संजय मडावी (१६) रा. प्रगती नगर या तिघांचेही मृतदेह लाइमस्टोन खाणीत शोध कार्य राबविणाऱ्या पोलिस पथकाला गवसले. एका तरुणाचा रात्री उशिरा, तर दोघांचे आज पहाटे मृतदेह आढळून आल्याने शहरात दुःखाचं वातावरण पसरलं आहे.
वांजरी या गावालगत लाइमस्टोनची खदान आहे. पावसाळ्यात या खदानीत पाणी साचत असल्याने लाइमस्टोनचे उत्खनन बंद ठेवले जाते. या लाइमस्टोन खदानीत तयार झालेल्या तलावात पोहण्याचा मोह अनावर झालेल्या शहरातील तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची काल वार्ता पसरल्याने पोलिसांनी या खाणीत शोध मोहीम राबविली. रात्र झाल्याने शोध कार्यात अडथळे येत असल्याने पोलिस तेथेच तळ ठोकून होते. शोध कार्य राबविणाऱ्या पोलिसांना रात्री एकाचा तर पहाटे दोघांचे मृतदेह आढळून आल्याने हे तरुण पोहण्याच्या नादात खोल पाण्यात बुडाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील हे तीनही मित्र दुचाकीने (MH २९ Y ५३४२) लाइमस्टोन खदानीत गेले. तेथे साचलेल्या पाण्यात पोहण्याचा मोह सुटल्याने हे तीनही तरुण खॊल पाण्यात बुडाले. तरुण खाणीत बुडाल्याची वार्ता वाऱ्यासारखी वणी शहर व आसपासच्या गावात पसरली. ही वार्ता पोलिसांच्या कानावर पडताच त्यांनी तात्काळ खदानीकडे धाव घेतली. त्याठिकाणी एक मोपेड दुचाकी, तीन तरुणांचे कपडे व मोबाईल आढळून आल्याने तरुण पाण्यात बुडाल्याचा संशय बळावला. पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली. रात्र झाल्याने शोधकार्यात अडथळे येऊ लागल्याने पोलिस तेथेच तळ ठोकून होते. दरम्यान रात्री एकाचा तर पहाटे दोघांचे मृतदेह आढळून आल्याने शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे. आसिम शेख, नुमान शेख व प्रतीक मडावी या तीनही मित्रांचे मृतदेह आढळून आल्याने शहरात दुःखाची लहर पसरली आहे. तरुणांच्या अशा या दुदैवी मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात तपास पोलिस करीत आहे.

No comments: