प्रशांत चंदनखेडे वणी
वणी पोलिस स्टेशन हद्दीत सुरु असलेले अवैध धंदे पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असतांनाही शहरात व शहरालगत असलेल्या गावांमध्ये छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरु असल्याच्या माहिती वरून पोलिसांनी या अवैध धंद्यांची माहिती गोळा करणे सुरु केले आहे. शहरात व शहरालगत सुरु असलेल्या मटका अड्ड्यांवर पोलिसांनी कार्यवाहीची मोहीमच उघडली आहे. छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या मटका अड्ड्यांबाबत माहिती मिळवून पोलिस या मटका अड्ड्यांवर धडक कार्यवाही करीत आहे. शहरातील एकता नगर परिसरातील प्रवासी निवाऱ्याजवळील एका गुपचूप विक्रीच्या गाडीमागे सार्वजनिक खुल्या जागेवर मटका जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकून एका मटका बहाद्दराला अटक केली आहे. त्याच्या जवळून पोलिसांनी मटका साहित्य व रोख रक्कम असा एकूण ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अवैध धंद्यांची माहिती गोळा करण्याकरिता पोलिस शहरात गस्त घालत असतांना त्यांना एकता नगर परिसरातील एका पाणीपुरी विक्रीच्या गाडी मागे खुल्या जागेत मटका जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली असता तेथे एक इसम हा चिट्ठीवर मटक्याचे आकडे लिहून देत पैशाची उतारी घेतांना रंगेहात सापडून आला. पोलिसांनी मटका पट्टी फाडणाऱ्या सय्यद हमीद सय्यद कदीर (३६) रा. मोमीनपुरा याला अटक करून त्याच्यावर मजुका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या जवळून पोलिसांनी मटका साहित्य व रोख रक्कम असा एकूण ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सादर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अजित जाधव यांच्या आदेशावरून पो.हे.कॉ. विकास धडसे, पो.कॉ. वसिम शेख, मिथुन राऊत, सुनिल नलगंटीवार, शंकर चौधरी यांनी केली.
No comments: