प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील वातावरणात आनंदाची लहर उसळली होती, तरुणाईत एक वेगळाच उत्साह संचारला होता, शासकीय मैदान आकर्षक सजावटींनी सजलं होतं, मैदानात उभारण्यात आलेला आकर्षक स्टेज डोळ्यांना खुणावत होता, रंगीबेरंगी रोषणाई मन मोहून घेत होती, तरुणाई बरोबरच महिला व जेष्ठांच्या गर्दीने भव्य पटांगण फुललं होतं, निमित्त होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भव्य दहीहंडी उत्सवाचं. अविस्मरणीय असं हे दहीहंडी उत्सवाचं स्वरूप होतं. हा अभूतपूर्व दहीहंडी सोहळा बघण्याकरिता अलोट गर्दी उसळली होती. साउंड सिस्टमही अतिशय उच्च दर्जाचे होते. डीजे मधून वाजणाऱ्या गाण्यांवर आपसूकच पावले थिरकत होती. डीजेवर बेधुंद होऊन तरुणाई थिरकली. त्यातच सिने अभिनेत्री प्राजक्ता माळीचं आगमन झालं, अन.. तरुणाईच्या उत्साहाला पारावारच उरला नाही. प्राजक्ता माळीने उपस्थितांना साद घालताच सर्वांनीच तिला प्रतिसाद देत आपले हात उंचावले. भव्य पटांगणात उत्साह व आनंदाचं वातावरण पसरलं होतं. ४१ फुटांची दहीहंडी, सोबत प्राजक्ता माळी आणि आकर्षक रोषणाईत दणकेबाज आवाजात वाजणारी डीजेवरील गाणी हा भारावणारा क्षण उत्साहप्रेमी जनतेने याच देही याच डोळा अनुभवाला. आणि हा योग्य जुळवून आणला मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने. कार्यक्रमाच्या शेवट पर्यंत तरुणाई डिजेच्या गाण्यांवर मनसोक्त थिरकली. मुंबईच्या गोविंदा पथकाने दहहंडी फोडली आणि एकच जल्लोष उडाला. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मुबई येथून आलेल्या गोविंदा पथकाने पटकावलं. परंतु राजू उंबरकर यांनी याठिकाणी आलेल्या कोणत्याही गोविंदा पथकाला रित्या हाताने जाऊ दिलं नाही. सर्वच गोविंदा पथकाला २५ हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून त्यांच्या कडून देण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या भव्य दहीहंडी उत्सवाने सर्वांचेच लक्ष वेधले. तरुणाई बेधुंद होऊन थिरकली. जनतेने मनसोक्त आनंद लुटला. प्राजक्ता माळीने सर्वांचं खुणावलं. शहर आकर्षक सजावटीने सजलं होतं. जनतेत आनंदाची लहर उसळली होती. उत्साहाप्रेमी जनतेची पाऊले दुपार पासूनच पटांगणाकडे वळतांना दिसली. तरुणाईचा उत्साह तर शिगेला पोहचला होता. पटांगण गर्दीने फुलून निघालं होतं. सायंकाळी कार्यक्रमाला सुरुवात झाली, अन.. तरुणाईत जल्लोष संचारला. अँकरनेही तरुणांचा उत्साह आणखीच वाढविला. अँकर स्वतः तरुणाईसोबत थिरकली. तरुणाईसाठी आनंदाची पर्वणी ठरलेला हा दहीहंडी सोहळा आठवणींच्या गाभाऱ्यात साठवून ठेवण्यासारखा होता. उत्साहप्रेमी जनतेने या सोहळ्याला भरभरून प्रतिसाद दिला. या सोहळ्याने जनतेत एक उत्साह व आनंद भरला. ४१ फुटांच्या दहीहंडीचा थरार अनुभवतांनाच प्राजक्ता माळी या देखण्या अभिनेत्रीला जवळून बघण्याचं सुखही मिळालं. हा योग जुळवून आणला मनसे नेते राजू उंबरकर यांनी या स्वप्नवत सोहळ्याच्या निमित्ताने. मुंबई, नागपूर, भंडारा, चंद्रपूर अशा विविध जिल्हे व महानगरातून गोविंदा पथकं दहीहंडी स्पर्धेत सहभागी झाली होती. मुंबई येथील गोविंदा पथकाने प्रथम बक्षीस पटकावलं. तर सर्वच गोविंदा पथकांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून २५ हजार रुपये देण्यात आले. पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्याच्या यशस्वीतेकरिता मनसेचे वणी विधानसभा क्षेत्राचे सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.



No comments: