Latest News

Latest News
Loading...

लोखंडी वीज खांब धोकादायक स्थितीत, अघटित घटना घडल्यास महावितरण राहील जबाबदार, ॲड. रुपेश ठाकरे

प्रशांत चंदनखेडे वणी 

मुंगोली या गावातील लोखंडी वीज खांब अतिशय जीर्ण झाले असून वीज खांब पूर्णतः जंगलाने ते तुटून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे धोकादायक स्थितीत असलेले लोखंडी वीज खांब बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंगोली गाव परिसरात असे अनेक वीज खांब असून महावितरणने सर्वेक्षण करून हे कोसळण्याच्या अवस्थेत असलेले वीज खांब त्वरित बदलण्याची मागणी मुंगोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच ॲड. रुपेश ठाकरे यांनी वणी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

महावितरणच्या दुर्लक्षित धोरणामुळे कित्येक अघटित घटना घडल्या आहेत. महावितरणचा बेजाबदारपणा कित्येकांच्या जीवावर बितला आहे. कुठे विद्युत तारा लोंबत असतात, तर कुठे विजेचे खांब वाकलेले दिसतात. काही दिवसांपूर्वी तुटून पडलेल्या विजेच्या तारांमुळे अनर्थ देखील घडला होता. असे असतांनाही महावितरणचे अधिकारी वीज वितरण प्रणाली सुरक्षित करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतांना दिसत नाही. मुंगोली गाव परिसरातील वीज खांब अतिशय धोकादायक स्थितीत असल्याच्या अनेक लेखी तक्रारी उपसरपंच ॲड. रुपेश ठाकरे यांनी अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. पण महावितरणचे अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करीत आहे. विद्युत तारा ओढण्याकरिता उभे करण्यात आलेले लोखंडी वीज खांब खूप वर्षांपासून बदलण्यात न आल्याने ते अतिशय जीर्ण झाले आहेत. वीज खांब पूर्णतः जंगल्याने ते तुटून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिवंत विद्युत तारा ओढलेले वीज खांब कोसल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने जीर्ण अवस्थेत असलेल्या वीज खांबांचे सर्वेक्षण करून ते त्वरित बदलण्याची मागणी मुंगोली या गावचे उपसरपंच ॲड. रुपेश ठाकरे यांनी वणी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. महावितरणने जीर्ण झालेले लोखंडी वीज खांब न बदलल्यास त्यापासून कुठलीही हानी झाल्यास महावितरण याला सर्वस्वी जबादार राहील, असा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे. 

No comments:

Powered by Blogger.