मुंबई नंतर वणी शहरात पहायला मिळणार ४१ फुटांच्या दहीहंडीचा थरार, आणि प्राजक्ता माळीही येणार, रेकॉर्ड ब्रेक थरांसाठी लाखोंची बक्षिसं
प्रशांत चंदनखेडे वणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तथा पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून मुंबई नंतर प्रथमच वणी शहरात ४१ फुटांचा अंगावर शहारे आणणारा दहीहंडी उत्सव साकारला जात आहे. ४१ फूट उंच असलेली दहीहंडी फोडतांनाचा हा अविस्मरणीय क्षण याच देही याच डोळा वणी उपविभागातील जनतेला पहायला मिळणार आहे. २०० गोविंदांचा सहभाग असलेला संघ ४१ फूट उंच दहीहंडी मानवी मनोरा तयार करून फोडतांनाचा थरार जनतेला अनुभवायला मिळणार आहे. या भव्य दहीहंडी सोहळ्याची मनसे कडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ४१ फूट उंच दहीहंडी फोडणाऱ्या गोंविंदांबरोबरच सिनेतारका प्राजक्ता माळी या सोहळ्याचे खास आकर्षण असणार आहे. प्रसिद्ध सिने अभिनेत्री व महाराष्ट्राची हास्य जत्रा या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमातून घराघरात पोहचलेली प्राजक्ता माळी पहिल्यांदाच वणी शहरात येत असल्याने सर्वांनाच या उत्सवाची उत्सुकता लागली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त हा दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. मुंबई नंतर महाराष्ट्रात प्रथमचं ४१ फूट उंच दही हंडी साकारली जात असल्याने या उत्सवाची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. या दहीहंडी स्पर्धेत २ लाख ५० हजार रुपये एवढं प्रथम बक्षीस ठेवण्यात आलं आहे. विदर्भात पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात येत आहे. त्यामुळे मनसेचा हा दहीहंडी उत्सव वणी उपविभागासाठी एक आकर्षण व तरुणाईसाठी आनंदाची पर्वणी असणार आहे.
शासकीय मैदानाच्या या भव्य पटांगणात (पाण्याची टांकी) ११ सप्टेंबरला दुपारी २ वाजता मनसे कडून या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. याठिकाणी महिलांसाठी बसण्याची खास व्यवस्था करण्यात आली आहे. मोठमोठ्या महानगर व जिल्ह्यातून गोविंदा पथक या दहीहंडी स्पर्धेत सहभागी होणार आहे. आतापर्यंत १५ गोविंदा पथकाने स्पर्धेकरिता नोंदणी केली असल्याचे मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. या स्पर्धेकरिता साऊंड सिस्टमही अगदीच उच्च दर्जाची व बाहेरून बोलावण्यात आली आहे. सर्वांसाठी सर्व व्यवस्था अगदीच नीट नेटकी ठेवण्यात आल्याचेही राजू उंबरकर यांनी यावेळी सांगितले. सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी या उत्सवाची खास आकर्षण राहणार असून हिरोईन शहारत येणार असल्याने तरुणाईमध्ये वेगळाच उत्साह संचारला आहे. ४१ फुटाची दहीहंडी मानवी मनोरा तयार करून गोविंदा पथक फोडणार आहे. हे चित्त थरारक दृश्य वणी उपविभागातील जनतेला याच देही याच डोळा पहायला मिळणार आहे. दहीहंडी स्पर्धेकरिता प्रथम बक्षीस २ लाख ५० हजार, द्वितीय बक्षीस १ लाख तर तृतीय बक्षीस ५० हजार रुपये ठेवण्यात आलं आहे. अगदी जल्लोषात हा दहीहंडीचा उत्सव रंगणार असून वणी उपविभागातील जनतेने या उत्सवाचे साक्षीदार होण्याकरिता भव्य संख्येने उपस्थिती दर्शविण्याचे आव्हान मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला मनसेचे नेते राजू उंबरकर, तालुकाध्यक्ष फाल्गुन गौरकार, शहर अध्यक्ष शिवराज पेचे, मनसेचे लक्की सोमकुवर, शुभम पिंपळकर आदी उपस्थित होते.



No comments: