प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील मोहर्ली या गावात घराच्या एका खोलीत जुगार खेळणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळून गंजी पत्ते व रोख रक्कम असा एकूण १६ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कार्यवाही आज ७ सप्टेंबरला करण्यात आली.
मोहर्ली या गावात घराच्या एका खोलीत गंजी पत्त्यावर जुगाराचा खेळ रंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कुणालाही सुगावा न लागू देता त्याठिकाणी धाड टाकली. घराच्या एका खोलीत काही इसम गंजी पत्त्यावर पैशाचा जुगार खेळतांना पोलिसांना रंगेहात सापडून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून नितीन शामराव नागपुरे (३४), राजू महादेव दुबे (५२), वसंता विश्वनाथ कोडापे (५९), ज्ञानेश्वर शंकरराव वडस्कर (४९), अमोल दामोधर ढवस (३४), राजू निळकंठ आत्राम (४८) सर्व रा. मोहर्ली या सहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्या जवळून गंजी पत्ते, चादर व रोख रक्कम असा एकूण १६ हजार ३७० रुपयांचा पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. या सहाही जुगाऱ्यांवर मजुका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अजित जाधव यांच्या आदेशावरून सपोनि माधव शिंदे, सफौ. सुदर्शन वानोळे, पोना हरिन्द्रकुमार भारती, पंकज उंबरकर, पोकॉ. विशाल गेडाम व चालक सुरेश किनाके यांनी केली.

No comments: