Latest News

Latest News
Loading...

सुसाट दुचाकी अनियंत्रित होऊन कारला धडकली, दुचाकी चालकाने आपल्या दोन साथीदारांसह कार मालकालाच केली बेदम मारहाण

प्रशांत चंदनखेडे वणी 

सुसाट दुचाकी चालवितांना दुचाकी अनियंत्रित होऊन कारला धडकली. कार मालकाने निष्काळजीपणे दुचाकी चालविणाऱ्या तरुणाला खडसावले असता त्याने आपल्या दोन मित्रांना फोन करून बोलाविले. या तिघांनीही कार मालकाला शिवीगाळ करीत दगडाने मारून गंभीर जखमी केले. हे भामटे एवढ्यावरच थांबले नाही तर कार मधिल महिलांनाही त्यांनी मारहाण केली. यावरून या भामट्यांच्या हिंमती किती वाढल्या आहेत, याची प्रचिती येते. हे गुंड प्रवृत्तीचे तरुण शहरात दहशत माजवत असून खुल्या सांडाप्रमाणे ते कुणावरही चवताळतांना दिसत आहे. एका परिवाराला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या दोन भामट्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांचा एक साथीदार मात्र अद्याप फरार आहे. दगडाने शरीरावर व डोक्यावर मारून गंभीर जखमी केलेल्या युवकाला आधी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर नंतर त्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. 

भालर टाऊनशिप येथे राहणारे एक कुटुंब १२ सप्टेंबरला वणी येथे खरेदी करिता येत असतांना दुपारी २ वाजता दीपक चौपाटी परिसरातील मटण मार्केट जवळ भरधाव दुचाकी त्यांच्या कारला धडकली. त्यांनी दुचाकी चालकाला सुसाट व निष्काळजीपणे दुचाकी चालविण्यावरून खडसावले. त्याने लगेच आपल्या साथीदारांना फोन करून बोलाविले. नंतर तिघांनीही मिळून कार मालकाला लाथा, बुक्क्या व दगडाने जबर मारहाण केली. या हैवानांनी कार मधील महिलांनाही ओढताण करून मारहाण केली. या तीनही आरोपींच्या मारहाणीत कार मालक रोहित सुभाष येवले (२७) हा गंभीर जखमी झाला असून त्याला आधी शहरातील एका खाजगी रुग्णालयात व नंतर नागपूर येथे हलविण्यात आले आहे. याबाबत सुभाष धोंडोजी येवले (५७) रा. भालर टाऊनशिप यांनी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारी वरून अजय विनायक येमूलवार (१८), राकेश ज्योतीराम किनाके (२४) दोघेही रा. रंगनाथ नगर व अन्य एका आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम ३९७, ३२४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना तात्काळ अटक केली. तर अन्य एकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. दोनही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. घटनेचा प्राथमिक तपास सपोनि दत्ता पेंडकर यांनी केला. 

घटनेचा पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय माधव शिंदे व डीबी पथक करीत आहे.  

No comments:

Powered by Blogger.