Latest News

Latest News
Loading...

कोंघारा कृषी महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम, लंम्पी आजारापासून पशुधनाच्या बचावाकरिता राबविली लसीकरण मोहीम



प्रशांत चंदनखेडे वणी 

पशुधनावर लंम्पी या आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला असून जनावरांना मोठ्या प्रमाणात या आजाराची लागण होऊ लागली आहे. लंम्पी या रोगापासून पशुधनाचा बचाव करण्याकरिता गावागावात मार्गदर्शन शिबिरं व लसीकरण मोहीम राबविली जात आहे. पांढरकवडा तालुक्यातील दातपाडी गावातही लंम्पी या रोगाबाबत मार्गदर्शन व लसीकरण शिबीर घेण्यात आलं. कोंघारा कृषी महाविद्यालयाच्या वतीने हे शिबीर घेण्यात आलं. कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी लसीकरणाची जबाबदारी पार पाडली. या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले कृषी अधिकारी डॉ. सिडाम यांनी गावातील नागरिकांना लंम्पी या आजाराबाबत मार्गदर्शन करून या आजारापासून जनावरांचा बचाव करण्याकरिता प्राथमिक उपचारपद्धती समजावून सांगितली. यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक दत्ता जाधव यांनी देखील लंम्पी या आजारापासून जनावरांचा बचाव कसा करावा, याबाबत विस्तृत मार्गदर्शन करतांनाच लसीकरण मोहीम राबविण्यामागच्या उद्देशाचं विवरण दिलं. महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी लंम्पी या आजाराची लागण झालेल्या जनावरांना लस (इंटकराफ - ०.५) देण्याची जबाबदारी पार पाडली. 

लंम्पी या रोगापासून पशुधनाचा बचाव व्हावा, हा सेवाभावी दृष्टिकोन जोपासून कृषी महाविद्यालय कोंघाराच्या माध्यमातून हा स्तुत्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. लंम्पी या आजाराची लागण झालेल्या जनावरांना लसीकरण करण्यात आले. जनावरांना लंम्पी हा आजार झाल्यास त्यापासून बचाव करण्याकरिता प्राथमिक उपचार पद्धतीही समजावून सांगण्यात आली. लंम्पी या आजाराबाबत घेण्यात आलेल्या मार्गदर्शन व लसीकरण शिबिरात कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी शर्वरी दसोडे, वैष्णवी काळे, रासेश्वरी जुमडे, सृष्टी गायमुखे, वैष्णवी कोटकर यांनी विशेष सहकार्य केले.

No comments:

Powered by Blogger.