प्रशांत चंदनखेडे वणी -
तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच असून आज 1 ऑक्टोंबरला आणखी एका युवकाने मृत्यूला कवटाळल्याची घटना उघडकीस आली आहे. विषाचा घोट घेऊन पुरड (नेरड) येथील युवकाने जीवनयात्रा संपविली. भुडकेश्वर जवळ रोडवर विष प्राशन केलेल्या अवस्थेत तो आढळून आला. त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यु झाला. हितेश बंडूजी कांबळे (२९) असे या आत्महत्या केलेल्या युवकांचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पण त्याने असा हा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या अशा या अकाली जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे.

No comments: