ड्राय डे च्या दिवशी अवैध विक्री करीता केलेला दारूचा साठा जप्त, स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कार्यवाही, अवैध दारू विक्रेत्यास अटक
प्रशांत चंदनखेडे वणी
राष्ट्रीय व धार्मिक सणांबरोबरच महापुरुषांच्या जयंत्या व काही ठराविक दिवशी शासन व प्रशासनाच्या आदेशानुसार दारूची दुकाने बंद ठेवली जातात. अशा दिवसांना ड्राय डे (Dry Day ) असे म्हटले जाते. पण याही दिवशी अवैधरित्या दारू विकली जाते. काही अवैध दारू विक्रेते दारूचा साठा करून बंदच्या दिवशी तो चढ्या भावाने विकतात. अशाच एका अवैध विक्री करिता करून ठेवलेल्या दारू साठयावर कार्यवाही करून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ३८ हजार २२० रुपये किंमतीची दारू जप्त केली आहे. २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी ड्राय डे पाळला जात असल्याने या दिवशी अवैधरित्या दारू विकली जाऊ नये म्हणून मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा पथक गस्त घालत असताना त्यांना घोन्सा गावाजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका पडक्या घरात दारूचा साठा करून ठेवण्यात आला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने त्याठिकाणी धाड टाकली असता त्यांना देशी दारूचा मोठा साठा आढळून आला.
ड्राय डे ला दारूची दुकाने बंद ठेवली जात असल्याने अवैध दारू विक्रेते या संधीचा फायदा घेण्याकरिता अवैधरित्या दारूचा साठा करून ती चढ्या भावाने विकतात. ड्राय डे ला अधिकृत दारू विक्रीची दुकाने बंद रहात असल्याने अवैध दारू विक्रीला उधाण येते. घोन्सा परिसरात अवैध दारू विक्री जोमात केली जात असल्याची कुणकुण स्थानिक गुन्हे शाखा पथकाला लागली. २ ऑक्टोबरला ड्राय डे असल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथक अवैध दारू विक्रेत्यांबद्दल माहिती मिळविण्याकरिता मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत गस्त घालत असतांना त्यांना घोन्सा गावाजवळ असलेल्या एका पडक्या घरात फकरू संभाजी नागपुरे रा. घोन्सा याने अवैध विक्रीकरिता दारूचा साठा करून ठेवला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिस पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली असता सदर इसम अवैधरित्या दारूची विक्री करतांना रंगेहात सापडून आला. पोलिसांनी तो दारू विक्री करीत असलेल्या घराची झडती घेतली असता तेथे देशी दारूचा मोठा साठा आढळून आला. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने घटस्थाळावरून ३८ हजार २२० रुपये किंमतीचा दारू साठा जप्त केला असून फकरू नागपुरे या अवैध दारू विक्रेत्याला अटक केली आहे. त्याच्यावर मदाका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. आधारसिंग सोनोने, यांच्या मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे योगेश डगवार, सुधिर पांडे, निलेश निमकर, भोजराज करपते, रजनीकांत मडावी, नरेश राऊत यांनी केली.

No comments: