Latest News

Latest News
Loading...

भरधाव ऑटो अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटला, एक प्रवासी ठार तर चार विद्यार्थी जखमी


प्रशांत चंदनखेडे वणी 

भरधाव ऑटो पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर चार विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज ४ ऑक्टोबरला सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास रांगणा नांदेपेरा मार्गावर घडली. गणपत धोंडू सातपुते (५५) रा. सेलू असे या अपघातात ठार झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. 

सेलू या गावावरून रांगणा मार्गे वणीला प्रवासी वाहतूक करणारा हा ऑटो चालकाच्या निष्काळजीपणामुळे रांगणा गावाजवळ रस्त्याच्या कडेला उलटला. ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे समजते. ऑटो चालक शंकर पारटकर हा सकाळी ७ वाजता नेहमी प्रमाणे ऑटोमध्ये प्रवासी बसवून वणीच्या प्रवासाला निघाला. दरम्यान नांदेपेरा येथून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्याने ऑटोत बसविले. त्यानंतर तो रांगणा मार्गे वणीकडे भरधाव ऑटो घेऊन निघाला. रांगणा गावाजवळ भरधाव ऑटो अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात गणपत धोंडू सातपुते हा प्रवासी जागीच ठार झाला. तर वणी येथे महाविद्यालयीन शिक्षणाकरिता ऑटोने प्रवास करणारे चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर चारही विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. निष्काळजीपणे व भरधाव ऑटो चालविल्याने चालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटले व हा अपघात घडला. ऑटो चालक बेजाबदारपणे ऑटो चालवून प्रवाशांच्या जीविताशी खेळत आहेत. ऑटो चालकांची सुरु असलेली स्पर्धा जीवघेणी ठरू लागली आहे. वेगावर नियंत्रण ठेवले जात नसल्याने अशा पराकारचे अपघात घडू लागले आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहे.  

No comments:

Powered by Blogger.