Latest News

Latest News
Loading...

ट्रॅक्टर पलटी होऊन चालक ठार, एका घटनेची शाई वाळत नाही तोच घडला दुसरा अपघात

प्रशांत चंदनखेडे वणी 

ट्रॅक्टर व ट्रॉली पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज ४ ऑक्टोबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास वणी भालर मार्गावरील धोपटाळा तलाव, हनुमान मंदिरासमोर घडली. वणी वरून भालरकडे मुरूम भरून जात असलेला ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबून चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाबाराव उत्तरवार वय अंदाजे ५५ वर्षे रा. न.प. शाळा क्रं. ८ जवळ, सेवा नगर असे या अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. 

आज सकाळी रांगणा रोडवर ऑटो पलटी होऊन प्रवासी ठार झाल्याची घटना घडली होती. या घटनेची शाई वाळत नाही तोच परत तसाच अपघात घडला. भरधाव ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली दबून चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मुरूम भरलेले ट्रॅक्टर वणी वरून भालरकडे जात असतांना चालकाचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या अपघातात बाबाराव उत्तरवार हा चालक ट्रॅक्टरखाली दबल्या गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टर बाजूला करीत चालकाचा मृतदेह बाहेर काढला. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. ट्रॅक्टर हा सतिश मुत्तलवार यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार जगदीश बोरनारे करीत आहे.  

No comments:

Powered by Blogger.